NANDED | दहा टक्के आरक्षण देऊन देखील आरक्षणाचा मार्ग निघत नाही त्यामुळे सरकारने लक्ष घालून मार्ग मोकळा करावा-रावसाहेब दानवे
नांदेड: आज केंद्र सरकारचे माजी राज्यमंत्री तथा नांदेड पक्षनिरीक्षक रावसाहेब दानवे यांनी नांदेडच्या झालेल्या पराभवास संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतल्यामुळे आमचा पराभव झाला आहे आणि ते आम्ही स्वीकारत आहोत. मराठा आरक्षणाविषयी सरकारने दहा टक्के आरक्षण देऊन देखील हा निर्णय मार्गी लागला नाही, त्यामुळे सरकारने येणाऱ्या काळामध्ये लक्ष घालून येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. मी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असून आज नांदेड येथे येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे, असे ते यावेळी म्हणाले
stay connected