NASHIK | भुजबळांना ठाकरे गटात घेण्यास विरोध, लासलगावला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
नाशिक - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री भुजबळ यांना शिवसेना ठाकरे गटात घेण्यास लासलगाव येवला मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला असून लासलगावमध्ये माजी आमदार कल्याणराव पाटील व तालुकाप्रमुख शिवा पाटील सूरासे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लासलगावमधील शिवसेना पदाधिकारी यांची झाली बैठक संपन्न झाली या बैठकीत मंत्री भुजबळांना एकमताने विरोध करण्यात आला.लवकरच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे खा.संजय राऊत यांची घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देणाऱ्या भुजबळांना पुन्हा शिवसेनेत का घ्यायचे
भुजबळांनी जाती जातीत तेढ निर्माण केल्याचा बैठकीत आरोप करण्यात आला.यावेळी भुजबळ हटाव - येवला बचाव यासह भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
stay connected