दृष्टीदोष दाखवून पूजा खेडकर आयएएस, वडिलांकडे 40 कोटींची संपत्ती, नगरमधून लढवली लोकसभेची निवडणूक

 दृष्टीदोष दाखवून पूजा खेडकर आयएएस, वडिलांकडे 40 कोटींची संपत्ती, नगरमधून लढवली लोकसभेची निवडणूक




पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात  बदली झाली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारण्याचा तथाकथित आरोप त्यांच्यावर होता.

आता त्यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खेडकर या यूपीएससीची परीक्षा अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून उत्तीर्ण झाल्या आहेत असा दावा आता केला जात आहे. दृष्टीदोष असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी यावेळी दाखवलं असल्याचे सांगितले जात आहे.

धक्कादायक बाब तर पुढे आहे. दिल्लीच्या एम्समध्ये यूपीएससीने त्यांना तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले परंतु त्या गेल्या नाहीत. कुठल्यातरी सेंटरमधून एमआरआय अहवाल मिळवत त्या कलेक्टर झाल्या असे म्हटले जात आहे.

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील असून ते माजी सनदी अधिकारी आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष राहिलेले माणिक खेडकर हे त्यांचे बंधू. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी दिलीप खेडकर यांनी मोहटादेवीला साकडेही घातल्याचा चर्चा होत्या.

दरम्यान दिलिप खेडकर हे या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीकडून  लोकसभेची निवडणूक लढले होते. 13 हजार 749 मते खेडकर यांना मिळाली होती.

दरम्यान निवणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात 40 कोटींची संपत्ती असल्याचे खेडकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. तसेच त्यांनी पुणे, अहमदनगर आणि नवी मुंबईतही फ्लॅट असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर देखील एका सनदी अधिकाऱ्याकडे इतकी प्रॉपर्टी कशी असू शकते यावर अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, दिलीप खेडकर यांच्याकडे 10 एकर जमीन जमीन ही वडिलोपार्जित आलेली आहे व तब्बल 60 एकर जमीन ते वनविभागाची कसत असल्याचे समोर आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.