मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणार्या कागदपत्रात शिथलता देण्यात यावी - सामाजिक कार्यकर्ते अमर वाळके यांची मागणी
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनात जाहीर केली.योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने अनेक कागदपत्रांची अट गातलेली आहे यामध्ये १)कुपन २)आधार कार्ड ३)बँक पासबुक ४)महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा डोमासाईल ५)फोटो.यामध्ये महाराष्ट्र राज्यातील दाखला बऱ्याच महिलांकडे उपलब्ध नाही. डोमासाईल काढण्यासाठी परत अनेक कागदपत्रांची गरज लागते यामध्ये शाळेचा दाखला/ निर्गम /बोनाफाईड/ विवाह नोंद दाखला. या सर्व कागदपत्रामुळे प्रत्येक गावातील महिला, नागरिकांमध्ये गोंधळाची अवस्था निर्माण झालेली आहे डोमसाईल फक्त तहसील कार्यालयातूनच देण्यात येते यामुळे तहसील यंत्रणेवर लोड आलेला आहे या सर्व कागदपत्र काढण्यासाठी खर्च ही बराच लागत आहे खर्च करून जर लाभार्थी पात्र झाला नाही तर त्याचा तो खर्च वाया जाईल व महिलांमध्ये निराशाचे वातावरण निर्माण होईल या सर्व यंत्रणामुळे गावागावात समाजात महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झालेले आहे.यामध्ये शासनाने विचार करून कागदपत्रांची आठ घालावी.
शासनाने जर या योजनेसाठी १)आधार कार्ड २) कुपन ३)उत्पन्न दाखला व जे डोमसाईल किंवा रहिवासी दाखला लागत आहे तो ग्रामपंचायत अंतर्गत देण्याचे सांगण्यात यावे. अशा कागदपत्रांची अट घातल्यास या योजनेचा लाभ घेणे सोपे जाईल असे सामाजिक कार्यकर्ते अमर वाळके यांनी म्हटले आहे या योजनेचा अंतिम तारीख 15 जुलै आहे या तारखेपर्यंत सर्व प्रोसेस पूर्ण होणार नाही. यामध्ये तारीख वाढवून देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र शासनाला तालुका प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने या सर्व गोष्टी लक्षात आणून द्यावेत व ही योजना सोपी व सरळ करण्यात यावी असे अमर वाळके यांनी म्हटले आहे.
stay connected