श्री क्षेत्र भैरवनाथ व विठ्ठल रुक्माई ते पंढरपूर पालखी दिंडी सोमवार प्रस्थान सोहळा

 श्री क्षेत्र भैरवनाथ व विठ्ठल रुक्माई ते पंढरपूर पालखी दिंडी सोमवार प्रस्थान सोहळा....



आष्टी प्रतिनिधी ....आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी येथील वै .हा.भ.प .यादव बाबा वै.ह.भ.प.वामनभाऊ महाराज व महादेवदरा यांच्या  आशीर्वादाने श्री क्षेत्र भैरवनाथ व विठ्ठल रुक्माई संस्थान ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा सोमवार पंढरपूर कडे प्रस्थान ह.भ.प. बापु महाराज नरवडे व हे.भ.प बबन महाराज करांडे यांचा मार्गदर्शक खाली श्री भैरवनाथ मंदिर बीडसागवी येथुन सोमवारी रेडेकर वस्ती आष्टी जामगाव कवडगाव चोंडी जातेगाव करमाळा कदम वस्ती झरेगाव जेऊर वडशिवणे सातोली तांबवे करकब भोसे फाटा विठ्ठल साखर कारखाना पंढरपूर या मार्गाने ठिका ठिकाणी मुक्काम करत आठ दहा दिवसांत माऊलीच्या भेटीसाठी पोचणार आहे बीड सांगवी येथील श्री भैरवनाथ मंदिर संस्थान व विठ्ठल रखुमाई संस्थान ते पंढरपूर पालखी दिंडी सोहळा 8 वर्षापासून चालत आला आहे यावर्षी साला प्रमाणे हे.भ.प बापु महाराज नरवडे.ह.भ‌.प बबन करांडे बीड सांगवी ते पंढरपूर पायी दिंडी आयोजन करण्यात आले आहे सोमवारी सकाळी दहा वाजता भैरवनाथ मंदिर बीड सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी अभोरा येताळवाडी किन्ही परसातील भाविक वारकरी मोठ्या भक्तिभावाने वातावरण खाधावर भगवा पताका टाळ मृदुंग चा मंगलसूर आणि पांडुरंगाचा जयघोष करीत उत्साहात दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान होणार असल्याचे महिती हे.भ.प बापु महाराज नरवडे.ह.भ.प बबन महाराज करांडे यांनी दिली आहे







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.