मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात महिला शिबिराचे आयोजन --आ.बाळासाहेब आजबे

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात महिला शिबिराचे आयोजन --आ.बाळासाहेब आजबे


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून एकही महिला लाभार्थी वंचित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी 
----आ. बाळासाहेब आजबे

---–--------------------------------------

आ.आजबे यांच्या हस्ते "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" पहिल्या महिला मेळाव्याचे खडकत येथे उद्घाटन

-----------------------------------------





आष्टी प्रतिनिधी 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये सरकारी कर्मचारी त्यामध्ये तलाठी ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये शिबिर घेण्यात येणार असून या योजनेपासून एकही लाभार्थी महिला वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन खडकत येथील महिला मेळाव्यात बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले.

महाराष्ट्र राज्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरत असलेली व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतदारसंघात यशस्वी करण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये महिला मेळावा घेऊन गाव तेथे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत या योजनेचा भाग म्हणून आज पहिल्याच महिला मेळाव्याचे उद्घाटन आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते खडकत येथे करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे युवकचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब घुले युवा नेते सुधीर जगताप पुस्तक भाई संतोष निंबाळकर आचार्य साहेब डॉक्टर जेवे संत निर्मळ राम उदमले शहाजी जेवे सतीश सोले यांची प्रमुख उपस्थिती होती

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पहिल्या महिला मेळावा खडकत तिथे संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी महिलांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की आता कोणत्याही महिला बहिणींना या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी गाव सोडून बाहेर जावे लागणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाचे कार्यकर्ते आपल्या गावातच येऊन फॉर्म भरून तो ऑनलाइन करून देणार आहेत दोन महिने मुदत असल्याने कोणीही चुकीचा फॉर्म भरून देण्याची घाई करू नये प्रत्येक गावात तलाठी ग्रामसेवक जाऊन सर्व कागदपत्र देणार असून कोणीही आष्टीला गर्दी करण्याची घाई करू नये सर्व बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही सर्व ती मदत करणार आहोत या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेऊन सर्व कागदपत्रांची जमवा जमव करून मगच ऑनलाईन अर्ज भरावा दोन महिन्यात कधीही अर्ज भरला तरी एक जुलै पासूनच पैसे खात्यावर पडणार आहेत त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये ,यापूर्वी खडकत साठी अनेक कामे दिली आहेत खडकत करांचे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही यापुढेही काही कमी पडू देणार नाही कारण त्यांनी आजपर्यंत  सर्वात जास्त प्रेम माझ्यावर केले आहे, तालुक्यातील एक इंच ही जमीन जीरायत राहू नये यासाठी मी यापुढेही प्रयत्न करणार आहे, आज मतदारसंघात 200 ते 250 कोटी रुपयांचे कामे मंजूर आहेत तर अनेक ठिकाणी कोट्यावढी रुपयाचे कामे सुरू आहेत यापुढेही जास्तीत जास्त निधी मतदार संघातील विकास कामासाठी आणता येईल तो आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे ,जनतेचे प्रेम असल्यामुळे  मतदारसंघाला काहीही कमी पडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाचे कार्यकर्ते हे येत्या दोन दिवसात पूर्ण तालुक्यातील महिला मेळाव्याचे नियोजन करणार आहेत या महिला मेळाव्यासाठी तालुक्यातील त्या त्या गावचे तलाठी ग्रामसेवक ग्राम पंचायत चे सरपंच उपस्थित राहणार असून गाव मध्येच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे मिळणार आहेत जास्तीत जास्त संख्येने महिलांनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी आजबे यांनी केले, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे युवक चे अध्यक्ष भाऊसाहेब घुले युवा नेते सुधीर जगताप मुस्ताक भाई आचार्य साहेब संतोष निंबाळकर डॉक्टर जेवे संजय निर्मळ राम उदमले सतीशोले शहाजी जेवे यांच्यासह खडकत येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.