महाविकास आघाडी फक्त मतदानासाठी मुस्लिमांचा वापर करून घेते मात्र सत्तेमध्ये भागीदारी देत नाही.


महाविकास आघाडी फक्त मतदानासाठी मुस्लिमांचा वापर करून घेते मात्र सत्तेमध्ये भागीदारी देत नाही. 




नुकताच 2024 लोकसभा निवडणूक आपल्या देशात पार पाडले गेली. 

यंदाच्या निवडणुकीत देशातील मुस्लिम समाजाने मोदी सरकार नको कारण मोदी सरकार व त्यांचे खासदार देशातील भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करीत आहे व दररोज काही न काही कारणाने मुस्लिम समाज. ख्रिश्चन समाज. दलित इत्यादी समाजावर सतत अन्याय करीत आहे अक्षपार्य भाषणे करून समस्त भारतीय मुस्लिम समाजावर दहशतीचा वातावरण निर्माण करून या देशातून मुस्लिम समाजाला एकंदरीत बहुजन समाजापासून दूर करण्याचा षडयंत्र करीत असल्याचे दिसून आले आहे. यंदा भारतीय मुस्लिमांनी विशेष करून इंडिया आघाडी सरकारला पसंती दिली. इंडिया आघाडीचे सर्व उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत निवडून देण्याचे मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मगुरू, सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्या त्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडून देण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. कोणताही मोबदला न मागता फक्त या देशातून घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकार व त्यांच्या घटक पक्षांना दूर करावा याकरिता मुस्लिम समाजाने पुढाकार घेतले होते. भारतात यापूर्वी कधीही मुस्लिम समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही एका पक्षाच्या मागे इतक्या ताकतीने उभे नव्हते. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या मागे उभे राहून त्यांनी हा संदेश दिला आहे की आम्ही सर्व मुस्लिम बांधव तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे. 



मुस्लिम समाजाने यावेळी भरभरून दिलेल्या मतदानाची इंडिया आघाडी व भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना जाणीव आहे की प्रत्येक मशिदीतून मुस्लिम धर्मगुरूंनी व सामाजिक संघटना व त्या भागातील दूरदृष्टी ठेवून समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मदत केली तर काही ठिकाणी जाहीर रित्या मशिदीतून आव्हान करण्यात आले की यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पाठीशी उभे राहावे एका दिलाने मुस्लिम समाजाने काम करून काँग्रेस पक्षाचे (13) खासदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (9) खासदार, शरद पवार एनसीपी (8) खासदार अशा उमेदवार निवडून दिले. मुस्लिमांना पर्याय असलेल्या वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाला सुद्धा यावेळी मुस्लिमांनी नाकारले आहे. त्याचे अनेक उदाहरण या ठिकाणी आम्ही देऊ शकतो. 



काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी दुटप्पी राहिल्याचे दिसून येत आहे.


लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवाराला अधिकृतरित्या पक्षाचे तिकीट दिली नाही. तरीही मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरभरून मतदान दिले.


नुकताच विधान परिषदेतील दोन मुस्लिमांची रिक्त झालेली जागा परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा दुर्राणी व काँग्रेस पक्षाचे एडवोकेट वजाहत मिर्झा यांची मुस्लिम हक्काची असलेली जागा सुद्धा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देऊ केली नाही. याबाबत अनेक काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा सुद्धा दिला मात्र महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी त्यांच्या राजीनामेची व उठावाची दखल सुद्धा घेतली नाही. यावरून असे स्पष्ट होते की महाविकास आघाडीला फक्त मुस्लिमांचे मते पाहिजे मुस्लिम समाजाने फक्त आम्हाला मतदानच करावा पण आम्ही मुस्लिमांना सत्तेत भागीदारी देणार नाही अशा त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. 


महाराष्ट्र मुस्लिम मुक्त विधान परिषद व लोकसभा मुक्त मुस्लिम केल्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करीत आहोत. 


महाविकास आघाडीने मुस्लिम मुक्त विधान परिषद केल्याचे या अन्याय विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुणे शहरातील असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघ व पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन प्रत्यक्षरीत्या आमची संघटना मुस्लिम समाज बांधवांमध्ये जनजागृती करणार आहे. याबाबत लवकरच पुणे शहरातील मुस्लिम धर्मगुरू, विविध पक्षात काम करणारे सर्व पक्षाचे मुस्लिम पदाधिकारी, सामाजिक संघटनांना एकत्रित करून "चिंतन बैठकीचा" आयोजन करून पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती आज आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. 

आज 8 जुलै 2024 पुणे श्रमिक पत्रकार संघ या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत.

अंजुम इनामदार 

अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच 

9028402814

मुख्तार शेख 

माजी नगरसेवक काँग्रेस पक्ष,

उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस पक्ष 

7875555587 

एडवोकेट शाहिद अख्तर 

ज्येष्ठ समाजसेवक

मौलाना निजामुद्दीन 

मुस्लिम धर्मगुरू 

कारी इद्रिस अन्सारी 

मुस्लिम धर्मगुरू 

एडवोकेट आमीन शेख 

अध्यक्ष. एआयसीपीएससी (काँग्रेस पक्ष)

इब्राहिम खान 

सामाजिक कार्यकर्ता

अन्वर शेख 

महासचिव पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल (काँग्रेस पक्ष)

इब्राहिम यवतमाळ 

सामाजिक कार्यकर्त

इत्यादी मान्यवर उपस्थित होते








Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.