कडा येथील नविन पुलाचे काम जलदगतीने करावे
आष्टी तालुक्यातील साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्यामुळे अखेर जे व्हायचे तेच घडले आणि जोरदार पावसामुळे अहमदनगर बीड रस्त्यावरील कडा येथे बायपास करून तयार केलेला मातीचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने परिसरातील पंधरा ते वीस गांवाचा संपर्क तुटला होता . त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत होते.संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अगोदर पुलाचे काम केले असते तर ही वेळ आली नसती.
याबाबत अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील साबलखेड ते आष्टी या नगर बीड रस्त्याचे सिमेंट रोडचे काम एक दीड वर्षापासून चालू आहे काम कासवगतीने चालल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात धुळीचा भरपूर त्रास सहन करावा लागला. तर जुन पासुन पाऊस सुरु झाला आहे. थोडा पाऊस झाला तरी चिडचिडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कडा येथील पुलाचे काम एप्रिल मे महिन्यात सुरू करण्यात आले. मोठा पुल असल्यामुळे यापूर्वीच काम सुरू करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी एप्रिल मे महिन्यात अगदी पावसाळ्याच्या तोंडावर पुलाचे काम सुरू केले व बायपास म्हणून मातीचा पूल
तयार करण्यात आला होता तो पहिल्याच पावसात वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.
परंतु दोन दिवसा नंतर पुन्हा त्याच बाय पास चे काम करून रस्ता रहदारी साठी आज गुरुवार दि.११ जुलै रोजी सकाळी सुरु करण्यात आला आहे परंतु पुन्हा पाऊस झाला तर पुन्हा वाहतूक ठप्प होणार यात शंका नाही यावर एकच पर्याय म्हणजे नविन पुलाचे काम जलदगतीने करावे अशी नागरिकांचे म्हणणे आहे.
stay connected