*शोध भूकंपाचा पुढच्या पिढीसाठी उपयुक्त पुस्तक* : जयंत येलुलकर

 *शोध भूकंपाचा पुढच्या पिढीसाठी उपयुक्त पुस्तक*  :  जयंत येलुलकर



अहमदनगर - *समाजासाठी विचार करणाऱ्या माणसांची वाणवा असून मैत्रीच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी देण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.,सुधीर फडके आणि स्व.सुधाकर केदारी यांनी आपले सुखदुःख बाजूला ठेवून शोध भूकंपाचा हे अभ्यासपूर्ण पुस्तक पुढच्या पिढीसाठी दिले आहे.निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे,* असे प्रतिपादन  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर यांनी केले. 

    शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने जेष्ठ सदस्य, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुधीर फडके व स्व.सुधाकर केदारी यांच्या शोध भूकंपाचा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कवीवर्य चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी विचारपिठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडूळे, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, वॉरियर्स फाउंडेशन च्या अध्यक्षा, कवयित्री शर्मिला गोसावी इ मान्यवर उपस्थित होते.

पुढें बोलतांना येलुलकर म्हणाले की, शहर चालते बोलते राहण्यासाठी विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवश्यकता असते. 

ज्ञानदेव पांडुळे बोलताना म्हणाले की,भूकंप ही एक अशी अनाकलनीय भूशास्त्रीय घटना आहे की त्याचे नक्की ठिकाण सांगणे शक्य नसते, अशा गोष्टीं बद्दलची परिपूर्ण माहिती या पुस्तकात असल्याने हे निश्चितच वाचनीय झाले आहे. 

अध्यक्षपदावरून बोलताना कवीवर्य चंद्रकांत पालवें म्हणाले की, निसर्ग व पर्यावरणाचे अभ्यासक असल्यानेच त्यांना भूकंपाचा शोध घेता आला या पुस्तकातून विविध माहिती मिळत असल्याने उपयुक्त असे पुस्तक झाले आहे शब्दगंधने नेहमीप्रमाणेच मुखपृष्टासह आतील मजकूर अखिव रेखीव केला आहे. 

   यावेळी लेखक सुधीर फडके म्हणाले की, नेमका ठराविक ठिकाणी कुठे भूकंप होईल याबाबत ठामपणे सांगता येत नसले तरी पूर्वानुभव किंवा भूकंपाचे भाकीत करता येऊ शकते, त्यासाठीचा अभ्यास असणे आवश्यक आहे, सुधाकर केदारी यांचा तो अभ्यास असल्यानेच हे पुस्तक लिहिता आले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वॉरियर्स फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला गोसावी यांनी केले तर सूत्रसंचालन कवयित्री सुरेखा घोलप यांनी केले शेवटी डॉ. तुकाराम गोंदकर यांनी आभार मानले. 

कार्यक्रमास गणेश भगत,लोखंडे, नवगिरे गुरूजी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लेखक स्व.सुधाकर केदारी यांच्या पत्नी, त्यांच्या मुली जावई यांचा व शोध भूकंपाचा पुस्तकाचे शब्दरूप लेखन करणारे सुधीर फडके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वॉरियर्स फाउंडेशनच्या सचिव संगीता गिरी, आरती गिरी, निखिल, हर्षली यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.