माजी आ. भीमराव धोंडे यांच्या जनसंपर्क अभियानास पाटोदा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद
आष्टी (वार्ताहर ):- आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी रविवारी दिनांक १४ जुलै रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत पाटोदा शहरात भर पावसात फिरून लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी आष्टी शहरातील प्रत्येक वार्डात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, रविवारी पाटोदा नगरपंचायत अंतर्गत असलेल्या गितेवाडी, बांगरवाडी, बेलेवाडी, रानमळा, भिमनगर तसेच शहरात फिरून ग्रामस्थांशी संवाद साधला. भिमनगर मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिपप्रज्वलन करुन अभिवादन केले. दुपारनंतर पाऊस सुरू झाला, पावसात देखील लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. शहरातील बाळासाहेब बन यांच्या श्रेयस डिजिटल व काॅम्पुटरला भेट देऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फाॅर्म बहिणींना माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
Advertis
तसेच दौऱ्या दरम्यान लहुराज नागरगोजे यांच्या निवृती ट्रेडर्स व हार्डवेअरचे उद्घाटन माजी आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी हभप रामकृष्ण रंधवे महाराज, नगराध्यक्ष राजु जाधव, सभापती श्रीहरी गिते व इतरांची उपस्थिती होती. दरम्यान
डॉ. कल्याण पोकळे यांच्या श्रद्धा हाॅस्पिटल,उत्तम शेवाळे यांच्या सोनाली मेडिकल, नाथ कृपा अर्बन मल्टीपल सोसायटी, अरुण सेठ कांकरिया, डॉ. बी. के. सुसलादे,हभप रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या आशिर्वाद कापड दुकान, आप्पासाहेब राख,साईनाथ मते,सतिष महाराज उरणकर, बाळासाहेब आवारे, डॉ. शेवाळे, तात्यासाहेब नागथई, लिट्ल फ्लावर इंग्लिश स्कूल, संजय गोरे, संदीप जाधव, बाळू बन,शेख जहिरभाई, हमिद पठाण, इकबाल पेंटर, सुशिल कवठेकर, माजी नगरसेवक सुभाष अडागळे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. जनसंपर्क अभियानात भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अजय दादा धोंडे,भिमराव गिते, माजी सरपंच रामराव तोटे,हरिभाऊ शिंदे, साहेबराव अडागळे, बिरुदेव काळे, महादेव मुळीक , संजय कांकरिया, कृष्णा धलपे, संदीप शिंदे,माजी सभापती अनिल जायभाय, निंबाळकर काका, संतोष पावसे,अंकुश काळे, पो. पा. रावसाहेब गिते, हरिदास गिते, देविदास काळे, विष्णू काळे, बंडोपंत काळे, महादेव धलपे, विशाल पावसे, बबन गिरी, भगवान जावळे, बाळासाहेब जावळे, कल्याण चव्हाण,सुदर्शन काळे , विक्रम काळे , किसन काळे ,अंकुश मुंढे व इतरांची ठिकठिकाणी उपस्थिती होती.
stay connected