आष्टीच्या सुपुत्रांच्या अल्याड पल्याड चा चौथ्या आठवड्यातही महाराष्ट्रभर स्मॅश हिट धुमाकूळ !!!

 आष्टीच्या सुपुत्रांच्या अल्याड पल्याड चा चौथ्या आठवड्यातही महाराष्ट्रभर स्मॅश हिट धुमाकूळ !!!





आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथील सुप्रसिद्ध अभिनेता सुरेश विश्वकर्मा आणि सिने लेखक संजय नवगिरे यांच्या अल्याड पल्याड या मराठी चित्रपटाने हिंदी चित्रपटांना टक्कर देत अक्षरशः महाराष्ट्र भर हाऊसफुल्ल धुमाकूळ घातला आहे. पहिल्या तीन आठवड्यात करोडो रुपयांचा गल्ला जमवून चौथ्या आठवड्यातही लक्षणीय झेप घेतली आहे.

सैराट , मुळशी पॅटर्न, रेगे यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटातून आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण करणारे अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि रेडू आणि टकाटक यासह अनेक दर्जेदार चित्रपटातून आपल्या लेखणीचा ठसा मायानगरीत उमटवणारे लेखक संजय नवगिरे ही जोडगोळी आष्टी तालुक्यातल्या कडा सहकारी साखर कारखाना येथे लहानची मोठी झाली . लहानपणापासूनची मैत्री जपता जपता शिक्षण पूर्ती नंतर दोघांनीही आपल्या उपजिविकेसाठी पुणे येथे धाव घेतली आणि याच जोड गोळीने आपल्या कौशल्याची बाजू पणाला लावून बॅक टु बॅक चित्रपटातून दमदार कामगिरी करीत आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. दोघांनीही आपल्या यादीतल्या वेगवेगळ्या चित्रपटातून मोठी भरारी मारताना त्यांचा अल्याड पल्याड हा एकत्रित सिनेमा प्रेक्षकांची पहिली पसंती ठरताना दिसतो आहे खास करून

मराठी चित्रपटांची मोठ्या पडद्यावर संथ गतीने वाटचाल चालू असताना अल्याड पल्याड सध्या मुंज्या,कल्की सारख्या सिनेमांना देखील आव्हान देत मराठी झेंडा सिने सृष्टीवर फडकवण्याचे काम करतो आहे ही बाब मराठी सिनेसृष्टी साठी संजीवनी ठरताना दिसते .दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं पटकथा आणि संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केलं असून अभिनेते सुरेश विश्वकर्मा , मकरंद देशपांडे,संदीप पाठक,गौरव मोरे,सक्षम कुलकर्णी , भाग्यम जैन यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मायानगरीत हाऊसफुल्ल चर्चेचा  विषय ठरलेल्या या चित्रपटाची शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी निर्मिती केली आहे .







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.