वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होत सुरेश धस यांनी अनुभवला वारी सोहळा.

 वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होत सुरेश धस यांनी अनुभवला वारी सोहळा.

***************************








*******************************

आष्टी(प्रतिनिधी)

 पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या दिंड्या,टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले आणि विठुरायाची भेट घेण्यासाठी आसुसलेले मन आणि हाच अनुभव याची देही याची डोळा अनुभवन्यासाठी सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सुरेश धस यांनी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांची संवाद साधत पायी चालण्याचा वारी सोहळा अनुभवला. ज्ञानबा तुकाराम च्या जयघोषात निघालेल्या वारकऱ्यांसमवेत चालताना भक्ती रसात सुरेश धस देखील तल्लीन झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.याप्रसंगी सुरेश धस यांचे प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले. यावेळी अनेक दिंड्यांमध्ये सहभागी होत सुरेश धस यांनी वारीचा आनंद यावेळी श्री ह.भ. प. स्वामी जनार्दन महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान मत्सेंद्रनाथ गड निमगाव (मायंबा)ता.शिरुर कासार,श्री ह.भ.प.रामेश्वर महाराज शास्त्री श्री.क्षेत्र ब्रम्हनाथ येळब संस्थान ता.शिरुर कासार,श्री ह भ प उद्धव महाराज शास्त्री माऊली संस्थान नारायणवाडी,ता.शिरुर कासारं,




श्री.क्षेत्र कानिफनाथ संस्थान कान्होबाचीवाडी ता.शिरुर कासार,श्री. क्षेत्र रामगड संस्थान बीड,श्री. क्षेत्र नारायणगड (धाकटी पांढरी) ता.बीड श्री क्षेत्र अश्वथलिंग संस्थान पिंपळवंडी ता.पाटोदा यासह आदी दिंडीत सहभागी होत पायी वारीत चालत विठू नामाचा गजर केला.याप्रसंगी ह. भ. प.मधुकर महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पालखी सोहळ्यास पंढरपूर येथील संस्थानच्या मठामध्ये वारकरी व महाराजांची भेट घेतली.तेव्हा संस्थांनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामे (महादेव मंदिर पिंड, छत्रपती शिवरायांचे स्मारक, महापुरुषांचे स्मारक(पुतळा),त्यासह विविध कामे दाखवत कामाची पाहणी केली.पाटोदा तालुक्यातील आठेगावपुठ्ठा परिसरातील वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच श्री. क्षेत्र मच्छिंद्रनाथ

 गड सावरगाव ता.आष्टी येथील सालाबादप्रमाणे मच्छिंद्रनाथ गड ते पंढरपूर पालखी सोहळ्यास हजारोंच्या संख्येने भाविक येतात त्यांची भेट घेऊन संवाद साधला.








आज पंढरपूर मध्ये होणार सुरेश धस यांच्या वतीने महापंगतीचे आयोजन. 

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड दिंडीतील वारकऱ्यांसाठी आज सुरेश धस यांच्या वतीने पंढरपूर येथे महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.