आ.बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नाने आष्टी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामास ८८ कोटी रु प्रशासकीय मान्यता

 आ.बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नाने आष्टी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामास ८८ कोटी रु प्रशासकीय मान्यता



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धित करून उपजिल्हा रुग्णालयास मान्यता काही दिवसांपूर्वी मिळाली होती या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाससाठी ८८ कोटी ३४ लक्ष रुपयेच्या कामास प्रशासकीय मान्यता आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नाने आज अखेर मिळाली आहे.आष्टी उपजिल्हा रुग्णालयाच्या  इमारतीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून हि प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल मतदार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब आरोग्यमंत्री तानाजी सावंत ,पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानतो असे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले .

पुढे बोलतानाआष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका म्हणाले की गेली दोन वर्षांपासून आपण या कामासाठी

पालकमंत्री धनंजय मुंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले त्यास काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली होती या मंजुरीस आज खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आले असून महाराष्ट्र शासनाने उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी 88 कोटी 34 लक्ष रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून या कामी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला होता आष्टी येथील उपजिल्हा रुग्णालय इमारत ही भव्य दिव्य स्वरूपामध्ये आष्टी बेलगाव रोडवरील प्रशस्त जागेमध्ये होणार आहे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसोई युक्त अशी व्यवस्था असणार आहे त्यामुळे आता आष्टी तालुक्यातील जनतेला अहमदनगर व बीड या ठिकाणी उपचारासाठी जाण्याची वेळ येणार नाही उपजिल्हा रुग्णालय व्हावे असे आपले स्वप्न होते या कामासाठी आपण शासनाकडे वेळोवेळी प्रयत्न केले होते त्याला आज यश आल्याने मनस्वी आनंद होत आहे असे शेवटी आमदार आजबे सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.