तेजवार्ता ने आधीच अंदाज व्यक्त केला होता . अखेर पूल गेला वाहून
राजेंद्र जैन / कडा
------------
तालुक्यात सोमवारी दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडा येथील नगर- बीड मार्गावरील कडा वाहतुकीसाठी कडी नदीवर तात्पुरता करण्यात आलेला तकलादू पूल अखेर नदीला पाणी आल्याने वाहून गेला आहे.
तेजवार्ता ने आधीच केला होता अंदाज व्यक्त👇
आष्टी तालुक्यात दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली असून चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे. सोमवारी दुपारनंतर कड्यासह परिसरात वादळी वा-यासह तुफान पाऊस झाल्याने नदीला प्रचंड पाणी आल्यामुळे कडा येथील नगर- बीड मार्गावर कडी नदीवर पुलाचे काम चालू असल्याने वाहतुकीसाठी तात्पूरता बायपास रस्ता तयार करुन या नदीवर पुल उभारण्यात आला होता. मात्र पहिल्यांदाच दमदार झालेल्या पावसामुळे हा तकलादू पूल अखेर नदीला पाणी आल्याने वाहून गेला. गेली एक वर्षापासून या पुलाचे काम महामार्ग अधिकारी व गुत्तेदारांच्या हलगर्जी पणामुळे संथ गतीने चालू आहे. याबाबत तेजवार्ता ने २९ जून रोजी या पुलाच्या कामासंदर्भात ठळक वृत्त प्रकाशित करुन लक्ष वेधले होते. परंतू अधिका-यांसह गुत्तेदारांनी कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच आज नगर- बीड मार्गावरील वाहतूकीचा प्रश्न डोकेदुखी बनला आहे.
--------%%---------
कडा परिसरात झालेल्या दमदार पावसाने नगर- बीड मार्गावरील कडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने तात्पूरता तयार करण्यात आलेला पुल वाहून गेला. त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता वाहनधारकांसह नागरीकांनी या मार्गावरुन ये-जा करताना पर्याय मार्गाचा अवलंब करावा.
- प्रमोद गायकवाड, तहसीलदार आष्टी.
--------%--------
stay connected