आष्टी आगारातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावले माजी मंत्री सुरेश धस
********************************
दोन सयंत्र स्वखर्चाने उपलब्ध करून दिले
आष्टी (प्रतिनिधी)
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आष्टी आगारामध्ये अवजड टायर खोलण्याचे मशीन आणि गंजलेले नटबोल्ट काढण्याचे मशीन नसल्यामुळे यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे होणारे कष्ट पाहून..पूर्व आमदार माजी मंत्री सुरेश धस यांनी ते दोन्ही यंत्रसामग्री व खर्चातून उपलब्ध करून दिली आहे यामुळे आष्टी आगारातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करून.. सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.. याबाबतची अधिक माहिती अशी की,काही दिवसांपूर्वी.. पूर्व आमदार माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी एका छोटेखानी कार्यक्रमानिमित्ताने भेट दिली
यावेळी यांत्रिक कर्मचाऱ्यांना जवळ घेऊन विचारपूस केली. यावेळी यांत्रिक कर्मचारी रघु चितळे यांनी अपुऱ्या यंत्रसामग्रीमुळे होणाऱ्या त्रासाची व्यथा मांडली असता...सुरेश धस यांनी लगेचच मदतीचा हात पुढे करत गाडीचे अवजड टायर खोलण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मशीन नादुरुस्त असल्याने तसेच गंजलेले झालेल्या नट बोल्ट काढण्यासाठीचे हे दोन मशीन तसेच इतर यंत्र सामग्री स्वखर्चाने विनाविलंब उपलब्ध करून यांत्रिक कर्मचारी यांच्याकडे स्वाधीन केल्या... ही अडचणीची मदत केल्याबद्दल राज्यमार्ग परिवहन महामंडळ आष्टी आगारातील यांत्रिकी आणि इतर कर्मचाऱ्यांनी अतिशय आनंदी भावना व्यक्त करत समाधान व्यक्त केले.यासाठी आज आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी सुरेश धस यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली
यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शरद खोत,वाहतूक निरीक्षक राजरत्न जाधव, साहाय्यक वाहतूक अधिकारी बबन गायकवाड तसेच आगारातील यांत्रिक कर्मचारी रघुनाथ चितळे,अशोक परदेशी, के.जी.गव्हाणे,बाळासाहेब थोरवे, सचिन काळे, सोपान आघाव,राजेंद्र ठाकरे, कैलास धोत्रे,चौधार,अविनाश देशमुख ,राजेश थोरे, सिडाम,गणेश वारंगुळे,दत्ता गायकवाड, थोरवे,लिंगे हे उपस्थित होते.
stay connected