मुर्शदपुर ग्रा.पं.रस्ते कामांना ९ कोटी रुपये मंजूरी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे जाहीर आभार
----सरपंच शालन मुळे
***********************************
*********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदारसंघातील रस्तेकामांसाठी शासनाकडून निधी खेचून आणत पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते कामांसाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर करून मास्टर स्ट्रोक मारला असून त्यामध्ये मुर्शदपूर, कासारी, शिदेवाडी या ग्रामपंचायत अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यांसाठी ९ कोटी रुपयाचा भरघोस निधी मंजूर करून आणल्याबद्दल माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे मुर्शदपुरचे सरपंच सौ.शालन अशोक मुळे यांनी जाहीर आभार मानले आहेत.
सरपंच सौ.मुळे पुढे बोलताना म्हणाले, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्ते आता सिमेंट काँक्रिटी होणार असून आता रस्त्यांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. हे अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ते माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मंजूर केल्याबद्दल मुर्शदपूर ग्रामस्थांच्यावतीने आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या ताब्यात मुर्शदपुर ग्रामपंचायत आल्यापासून विविध विकास कामाच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नव्याने मंजूर रस्ते कामामध्ये कन्या शाळा ते माऊली मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता करणे - ५ कोटी व आष्टी शहर ते जुना पिंप्री रस्ता करणे. (आष्टी-शिराळा रस्त्यापर्यंत) - ४ कोटी हे अत्यंत जिव्हाळ्याचे रस्ते माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व आमदार सुरेश धस मित्र मंडळ मुर्शदपुर कासारी शिदेवाडी तसेच सरपंच सौ.शालन अशोक मुळे, उपसरपंच जालिंदर वांढरे, माजी जि. प.सदस्य खंडू जाधव, युवा नेते सचिन लोखंडे, मुर्शदपुर पं.स.गणाचे सदस्य अशोक मुळे व सर्व ग्रामपंचाय सदस्य यांनी जाहीर आभार मानले आहेत.
stay connected