गट शेतीची चळवळ आणखी प्रभावीपणे उभारणे काळाची गरज -सुरेश धस

 गट शेतीची चळवळ आणखी प्रभावीपणे उभारणे काळाची गरज  - सुरेश धस



माऊली शेतकरी गटाचे कौतुक करत कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

आष्टी (प्रतिनिधी)

कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून १ जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी.याचेच औचित्य साधून हरितक्रांतीचे जनक महानायक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा १११ जयंती साजरी करतोय. मात्र सद परिस्थितीत विषमुक्त शेती होणे ही काळाची गरज असून माऊली शेतकरी गट अतिशय ताकतीने प्रयत्न आहे  कौतुक करतोच त्याचबरोबर आपल्या तालुक्यासह मतदारसंघात गटशेतीची चळवळ आणखी प्रभावीपणे उभारणे काळाची गरज असल्याची माजी राज्यमंत्री सुरेशदास यांनी इच्छा व्यक्त केली वाढली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली.

       ते आष्टा ह.ना. येथील जि.प. प्रा.शाळेत आयोजित कृषी दिनानिमित्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प. सदस्य अमर निंबाळकर,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,सरपंच गणेश माळवे,मंडळ अधिकारी कोळ,गटाचे नियंत्रक सतिष पठाडे,पाणी फाउंडेशन टीमचे तालुका समन्वयक प्रवीण काथवटे,गुलशन पाहुणे व सागर गोरे उपस्थित होते.

        विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गावांमध्ये गटशेती व नैसर्गिक किड नियंत्रणाबाबत घोषवाक्यांच्या मदतीने जनजागृती रॅली काढण्यात आली.१स्व.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात माऊली गटाचे निमंत्रक सतीश पठाडे म्हणाले की,आमच्या माऊली शेतकरी गटात एकूण बारा सदस्य असून २०२३ मध्ये तुरीचे एकरी दहा ते अकरा क्विंटल विषमुक्त तुरीचे उत्पादन घेतले.ती तुर टुब्रदर्स या नामांकित ऑरगॅनिक कंपनीला विक्री केली.कंपनीने गटाकडे दाळ बनवण्यासाठी ठेवली होती आणि सर्व बनवलेली तूर डाळ ही त्यांनी अमेरिकेत पाठवली.आमच्या गटाचा गेल्या वर्षी पाणी फाउंडेशनची फार्मर कप स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत राज्यातल्या एकूण साडेचार हजार गटापैकी जे २१ गट राज्य पातळीवर निवड झाली. राज्यपातळीवर बक्षीस न भेटता तालुका पातळीवरील क्रमांक १ चे एक लाख रुपये चे बक्षीस मिळाले.भविष्यात हा गट एक खूप मोठी कंपनी उभारण्याचे स्वप्न साकार करणार आहे.शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे वळावे यावेळी बोलताना विनंती केली.

यावेळी कृषी अधिकारी तरटे बोलताना म्हणाले, नैसर्गिक कीड नियंत्रण व विषमुक्त शेती याच्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती सांगत नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून गटातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा आश्वासन यावेळी दिले.

अन्नदाता शेतकरी गट जामगाव तसेच राजमाता महिला शेतकरी गट गांधणवाडी यांनीही या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

यावेळी गटातील सदस्य रमेश पठाडे,

बाबासाहेब कोल्हे,भाऊराव धोंडे,अशोक झांबरे,शहाजी झांबरे,नितीन पठाडे,अमोल पठाडे,विशाल पठाडे,अय्या शेख,वैभव पठाडे,

सुदाम पठाडे यांच्यासह अनेक तसेच कृषी विभागाचे सर्व कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी, आष्टा जामगाव गांधणवाडी येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.