महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे आता जलद गतीने होणार - सानप साहेब
आष्टी प्रतिनिधि - आष्टी पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप साहेब यांच्या हस्ते ग्राम रोजगार सेवक यांना 127 टॅब वाटप करण्यात आले. यावेळी सानप साहेब यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की ग्रामरोजगार सेवक जरी कायमस्वरूपी नोकरीला नसला तरी आपण एका कुटुंबातील सदस्य आहोत, तुमची काही अडचण असेल तर आमचे सर्व कर्मचारी किंवा मी स्वतः माझ्याकडे तुमची तक्रार नोंदवा.ग्राम रोजगार सेवक हा पूर्ण गावाचा असतो, यावेळी कोणी राजकारण करू नये, आपण सर्वांनी जर मिळून काम केले तर गावचा विकास नक्की होईल, ग्राम रोजगारसेवक व नरेगा मधील सर्व कर्मचारी यांनी चुकीचे कामे केली तर त्यांची गय केली जाणार नाही अशी ताकीद गटविकास अधिकारी सानप साहेब यांनी दिली.
तसेच राऊत साहेब यांनी कृषी विभागातील योजने अंतर्गत कोणते कामे आपण करू शकतो यांचे मार्गदर्शन केले .यावेळी विस्तार अधिकारी जायभाय साहेब, शिंदे साहेब , सर्व पी. टी.ओ, क्लार्क, पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी, रोजगार सेवक उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांचे गावामध्येच काम पूर्ण झाले पाहिजे, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडू नये, शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये, विहीर शेत तलाव, सार्वजनिक कामे, घरकुल,आदी योजनांचे कामे गावामध्येच झाली पाहिजे,तसेच गावांचा विकास , गावातील कामे गावातच पूर्ण व्हावीत व गाव प्रगती पथावर जावे यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावर मस्टर करण्यास सुरवात केली, व आज प्रत्येक रोजगार सेवकाला ऑनलाइन कामे करण्यासाठी 127 टॅब वाटप करण्यात आले हा उपक्रम शासनाने अतिशय चांगला राबवला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून ग्रामरोजगार सेवक व ग्रामस्थ, शासनाचे आभार मानत आहे. यावेळी ग्राम रोजगार सेवक किरण पोठरे यांनी आभार मानले..
stay connected