आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी ॲड. निर्मलाताई सोनवणे यांची निवड

 आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी
ॲड.  निर्मलाताई सोनवणे यांची निवड 



आष्टी ( प्रतिनिधी) 



     आष्टी तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती सुवर्णाताई गिरे यांची बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आष्टीच्या जिजाऊ ब्रिगेडची जागा रिक्त झाली होती. या जागेवर आष्टी येथील प्रसिद्ध डॉक्टर विलासराव सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी शिवमती ऍड निर्मलाताई सोनवणे यांचे निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी बापू जंजिरे व सुवर्णाताई गिरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 


मुलांची पहिली गुरु त्यांचीआई असते   ..  इंजि.तानाजी जंजिरे

     


      लहान मुलांची पहिली गुरू त्याची आई असते. म्हणजे जिजाऊ. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर वडिलांच्या बोटाला धरून चालायला लागतात. आणि मुले शाळेत गेल्यानंतर त्यांचे गुरु शिक्षक असतात. असे प्रतिपादन आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.तानाजी बापू जंजिरे यांनी केले. राजमाता जिजाऊ वसतिगृहातील सभागृहामध्ये आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्ह्याध्यक्षा शिवमती सुवर्णाताई गिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

      पुढे बोलताना इंजि. जंजिरे म्हणाले की समाजामध्ये मुले घडवण्याचे काम व त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम फक्त जिजाऊच करू शकतात. समाजाचे नियम पाळण्याचे काम व मूल्यशिक्षण आपल्या मुलांना जिजाऊंनी आपापल्या घरातच दिले पाहिजे. त्याचप्रमाणे बचत गट व इतर माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम जिजाऊ ब्रिगेडने हाती घेतले पाहिजे .असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शशिकांत कन्हेरे यांनी केले. 

     यावेळी मराठा सेवा संघ कार्यकारिणीतील पदाधिकारी सर्व शिवश्री लक्ष्मण रेडेकर, बन्सीधर मोरे, प्रल्हाद तळेकर, भास्कर निंबाळकर, ऍड सीताराम पोकळे पत्रकार, सुरेश पवार, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अविनाश जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व शिवमती अनिता निंभोरे, वर्षाताई शिंदे, खाडे ताई, बनताई, गिरी ताई आदी मान्यवर उपस्थित होते. 

    नवनिर्वाचित अध्यक्षा ऍड. निर्मलाताई सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष शिवमती सुवर्णाताई गिरे यांनी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. लक्ष्मण रेडेकर यांनी केडर कॅम्पचे महत्त्व सांगितले. शेवटी वर्षाताई शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.