" मुख्यमंत्री लाडकी बहीण " योजना यशस्वी होण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत - पूर्व आ.सुरेश धस

 " मुख्यमंत्री लाडकी बहीण " योजना यशस्वी होण्यासाठी
प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत - पूर्व आ.सुरेश धस




लाडकी बहीण योजना यशस्वीतेसाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा - जिल्हाधिकारी अविनाश पाठक

आष्टी (प्रतिनिधी) 

मुख्यमंत्री लाडके बहीण ही योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या यशस्वीतेसाठी शासन स्तरावरील यंत्रणा आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे या योजनेतील लाभार्थी नोंदणीसाठी महसूल विभाग स्तरावर किंवा जिल्हास्तरावर स्वतंत्र ॲप निर्माण करावेत अशी

काही सुधारणा व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून..

महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी असलेल्या  मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळवून द्यावा लाभ न मिळाल्यास आपल्या बहिणी नाराज होऊ नयेत याची काळजी घ्यावी असे आवाहन पूर्व  आमदार,माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले तर मुख्यमंत्री लाडके बहीण ही योजना यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा पत्रकारांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी असे आवाहन बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले  आष्टी नगरपंचायत येथे आयोजित अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या समवेत आयोजित मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

               यावेळी आष्टी नगरपंचायत येथे नव्याने बीड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले अविनाश पाठक,बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड, आष्टीचे गटविकास अधिकारी सचिन सानप आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी बाळदत्त मोरे,उपअभियंता सुनील कुलकर्णी, नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अशोक पवार,गटनेता किशोर झरेकर, नगरसेवक भारत मुटकुटे,शरीफ शेख,समीर शेख,इर्शान खान,नाजीम शेख,श्याम वाल्हेकर, सुनील रेडेकर,लेखापाल प्रकाश हारकळ,इंजि.अथहर बेग,इंजि.गहिनीनाथ शिरसाठ,सतीश जगदाळे,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, पत्रकार रघुनाथ कर्डीले, पत्रकार भीमराव गुरव,पत्रकार संतोष सानप,सचिन रानडे,पत्रकार यशवंत हंबर्डे,समीर पठाण,गणेश कुलकर्णी आदीसह शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

 पुढे बोलताना.. सुरेश धस म्हणाले की,

 मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करताना ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स हा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांकडे सादर करतील.. सेतू सुविधा केंद्र चालकांनी या अर्जाची पावती द्यावी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शासनाचा ॲप आहे त्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून नोंदणी करण्यात येणार असल्यामुळे वारंवार अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे आपण शासनाकडे महसुली विभाग स्तरावर किंवा जिल्हास्तरावर या ॲपची स्वतंत्र सुविधा करण्यात यावी अशी मागणी करणार असून वेळेत 31 ऑगस्ट पूर्वी संपूर्ण राज्यातील अर्ज नोंदणी यशस्वी करण्यासाठी ही यंत्रणा राबवावीच लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच ही यंत्रणा केवळ महिला व बाल विकास विभाग यांचे कडेच राहिल्यास मुदतीमध्ये अर्ज स्वीकारण्यास वेळ लागेल त्यामुळे महसूल विभागाकडे देखील या योजनेचे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे या योजनेमध्ये आपल्या गोर गरीब महिला बहिणी सहभागी होणार असल्यामुळे शासकीय यंत्रणे बरोबरच विशेषतः कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत सदस्य नगरपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेतू सुविधा केंद्र चालकांनी या योजनेतील अर्ज घेऊन आलेल्या अंगणवाडी सेविकेकडील अर्ज इतर अर्जांपेक्षा प्राधान्याने स्वीकारून स्वीकारून शासनाकडील प्रति अर्ज 50/ रू. रुपये मिळणार आहेत त्यामुळे इतर कोणत्याही प्रकारे पैसे मागू नयेत या सेतू सुविधा केंद्र वरील गैरप्रकाराची जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन एखादा सेतू सुविधा केंद्र चालक गैरप्रकार करीत असल्याचे आढळल्यास कोणाचीही गय न करता तात्काळ त्याचा परवाना रद्द करावा 1500/ रू. रुपये प्रति महिना या बहिणींना मिळणार असल्यामुळे आणि थेट बँक खात्यावर रक्कम जाणार असल्यामुळे आपल्या गोरगरीब माता भगिनी यांच्या संसारासाठी  हातभार लागणार आहे कारण ग्रामीण भागामधील 90%  माता-भगिनी कष्ट करून आपला संसार सुरळीत चालवत आहेत त्यामुळे या माता-भगिनींना आर्थिक मदत ही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे 

केंद्र शासनाने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेद्वारे थेट माता-भगिनींच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अत्यंत चांगली असून ज्या बहिणीला 1500/ रू. रुपये मिळतील तिचे आशीर्वाद मिळतील परंतु ज्या बहिणीला पात्र असून देखील लाभ मिळाला नाही तर त्या बहिणी नाराज होतील याची प्रकर्षाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यावेळी पुढे म्हणाले की अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो एका अर्ज नोंदणीला तीन मिनिटे लागतात प्रशासकीय यंत्रणा सर्व मदत करण्यास तयार असून बँक खाते रेशन कार्ड नसेल तर काही तरतुदी आहेत आधार कार्ड मात्र अत्यावश्यक आहे या निमित्ताने आवश्यक असलेली केवायसी देखील होऊन जाईल स्वतः लाभार्थी देखील अर्ज करू शकता ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज हा अंगणवाडी ताई यांचे कडून सेतू सुविधा केंद्रावर दाखल करण्यात आल्यानंतर तो अप्रुव्ड होईल.. तोपर्यंत हा अर्ज पेंडिंग असे दाखवेल पुढे नंतर हा अर्ज स्वीकारला जाईल पूर्ण बीड जिल्ह्यातील अर्ज 20 ते २५ जुलै या दरम्यान भरून घेण्यात यावेत असा आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानंतर देखील नेमकी काय परिस्थिती असेल याचा अंदाज घेऊन आपण पुढील प्रयत्न करणार आहोत 

प्रशासकीय यंत्रणा समाजातील सजग व्यक्ती आणि पत्रकार यांनी ही योजना यशस्वी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आणि व्यापक प्रसिद्धी देण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी शेवटी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक बाळासाहेब तळेकर यांनी केले


सेतू सुविधा चालक हुशार असल्यामुळे " कुसुम सौर योजना " केवळ गेवराई तालुक्यामध्ये यशस्वी झाली मराठवाड्यासह 10 जिल्ह्यात 10 टक्के लाभार्थी असून एकट्या गेवराई तालुक्यात 90% लाभार्थी आहेत अशी परिस्थिती या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची होऊ नये
सुरेश धस
माजी मंत्री,आष्टी









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.