जैन धर्माच्या चातुर्मास कालावधीमध्ये उघड्यावर मांस विक्री करू नये-- नगराध्यक्ष जिया बेग यांचे आवाहन
********************************
*********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरांमध्ये जैन श्रावक संघ्याच्यावतीने जैन साधू परमपूज्य अनुप्रेक्षाजी महाराज,परमपूज्य श्रुती प्रभाजी महाराज, परमपूज्य ऋतू प्रभाजी महाराज या तीन सांधवींच्या प्रवेशात चातुर्मासास आज शुक्रवार दि.१३ जुलै रोजी पासुन आरंभ होणार आहे.
पवित्र असलेल्या आणि भक्तिमय असणाऱ्या चातुर्मास कालावधीमध्ये म्हणजेच पुढील चार महिन्यांसाठी उघड्यावरती मास विक्री करू नये अशी विनंती नगराध्यक्ष जिया बेग यांनी केली आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष जिया बेग म्हणाले,आष्टी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन जैन धर्मियांच्यावतीने करण्यात येणार असून ज्यामध्ये रात्री जेवणाचा त्याग उपवास, प्रवचन, मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचा समावेश होणार आहे. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यभरातून भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.आठ वर्षानंतर आष्टी शहरात हा चतुर्मास होत असून यानिमित्त शुक्रवारी सकाळी जैन श्रावक संघाच्यावतीने आष्टी शहरांमध्ये भव्य शोभा यात्रा निघणार आहे. यामध्ये जैन बांधव तसेच शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासाठी या चार महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व धर्म समभाव अशी भावना मनात ठेवून सर्व मास विक्री करणाऱ्या बांधवांनी उघड्यावरती मांस विक्री करू नये अशी विनंती आष्टी नगरपंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी केली आहे
stay connected