कडी नदी वरील वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी पूल कालच्या अतिवृष्टीने गेला वाहुन

 कडी नदी वरील वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी पूल कालच्या अतिवृष्टीने गेला वाहुन




कडा / राजेंद्र जैन

Vdo पहा 



आष्टी तालुक्यातील कडी नदी वरील वाहतुकीसाठी  तयार केलेला पर्यायी पूल कालच्या अतिवृष्टीने वाहून गेला . 

Tejwarta ने व्यक्त केला होता हा 👇 अंदाज



गेल्या अनेक महिन्यांपासून साबलखेड ते आष्टी रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे . या रस्त्यावरील सर्वात मोठा पुल म्हणजे कडा येथील कडी नदीवरचा पुल आहे . या पुलाचे काम पावसाळ्याच्या तोंडावरच सुरू करण्यात आले मात्र हे कामही रस्त्याच्या कामासारखे धिम्या गतीने सुरू आहे . काम सुरू असताना संबंधीत ठेकेदाराने पर्यायी साधारण पुल तयार केला होता . कालच्या पावसाने तो पुल वाहुन गेला असुन वाहतुक ठप्प झाली आहे . तेजवार्ताने या विषयी बातमी प्रसिद्ध केली होती मात्र कामात तत्परता न दाखवल्या चा परिणाम असा झाला की हा पर्यायी पूल वाहून गेला आहे .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.