मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महिला हवालदिल अद्यापही संकेतस्थळ चालू नसल्यामुळे महिला अडचणीत
सरकारने तात्काळ संकेतस्थळ चालू करावे - माहिती अधिकार कार्यकर्ते बाबु देवकर यांची मागणी
स्त्री पुरुष समानता साध्य करणे व सर्व महिला व मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे. महिलांना आर्थिक सामाजिक आणि राजकीय उपक्रमात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध धोरणे राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाने 7 मार्च रोजी चौथी महिला धोरण जाहीर केले आहे त्याबाबत अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे परंतु
शासनाने अद्यापही याचे अधिकृत संकेतस्थळ सुरू केलेले नाही त्यामुळे अनेक महिला संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे अर्ज भरण्यासाठी अनेक महिलांना शासन दरबारी चकरा माराव्या लागत आहेत. अनेक महिलांना यामध्ये त्रास सहन करावा लागत आहे अनेक शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत त्यामुळे अनेक महिलांना रांगेत थांबावे लागत आहे त्यामुळे व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आलेला आहे त्यामुळे वरील गोष्टींचा विचार करून शासनाने लवकरात लवकर संकेतस्थळ सुरू करावी व महिलांना न्याय द्यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाबू देवकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात व निवेदनात म्हटले आहे.
stay connected