संत वामनभाऊ महाराज दिंडी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना माजी आ. भीमराव धोंडे यांच्या वतीने महापंगत, २५ वर्षाची परंपरा कायम

 संत वामनभाऊ महाराज दिंडी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना माजी आ. भीमराव धोंडे यांच्या वतीने महापंगत, २५ वर्षाची परंपरा कायम

  






आष्टी ( दिगंबर बोडखे  ) :- विठ्ठल नामाचा गजर करीत दहा दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूर जवळील  पखालपूर येथील श्री क्षेत्र गणपती मंदिर येथे क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावतीने सोमवारी १५ जुलै रोजी महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो  वारकऱ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. गेल्या पंचवीस वर्षापासून माजी आ.भीमराव धोंडे हे वारकऱ्यांना पंढरपूर जवळ महापंगत देतात.

Vdo पहा



       दिनांक १४ जुलै रोजी संत सावता महाराज संजीवन समाधी असलेल्या अरण येथे मुक्काम करून दिंडी पखालपूर कडे रवाना झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यातील लाखो वारकरी आपापल्या भागातील दिंड्यामधून पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. 




          संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो वारकरी  सहभागी झाले आहेत. १३१ वर्षापूर्वी संत वामन भाऊ महाराज यांनी या पालखी सोहळ्याची सुरुवात  केली होती. अहमदनगरसह  मराठवाड्यातील  वारकरी संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीत सहभागी होतात. मराठवाड्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा म्हणून श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या दिंडीची ओळख आहे. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथून सहा जुलै रोजी या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. करमाळा तालुक्यातील वरकुटे येथून   माजी आ. भीमराव धोंडे  पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले, पाच किलोमीटर अंतर दिडींत वारकऱ्यासोबत चालत पाच तास दिंडीचा आनंद घेतला. अरण येथील मुक्कामनंतर दिंडी सोहळा पंढरपूर जवळील पखालपूर येथे आल्यानंतर माजी आ. भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत आरती झाली त्यानंतर पालखी साठी नैवेद्याचे ताट करुन वारकऱ्यांच्या पंगती बसविण्यात आल्या. माजी आ. भीमराव धोंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा  धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे, चेअरमन राजेश धोंडे यांनी वारकऱ्यांना पंगतीत प्रसाद वाढण्याचे काम केले. आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील  हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.