धनगर व वडार समाजाच्या उपोषणास समाजसेवक सुरेश पाटील यांनी दिली भेट.
बीड (प्रतिनिधी) देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही धनगर व वडार समाजाला अनुसूचित जमातीत (एस. टी.) आरक्षण देण्यात यावे, यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई आकाश निर्मळ यांनी बीड शहरातील बार्शी नका येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. उपोषणकर्ते भाई आकाश निर्मळ यांच्या मागणीला शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी भाई आकाश निर्मळ यांच्या तब्येतीची विचारपूस करून धनगर व वडार समाज हा खऱ्या अर्थाने भटका समाज असून या समाजाचा सामाजिक व आर्थिक विचार करून महाराष्ट्र सरकारने धनगर वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये सामावेश करून त्यांचा सामाजिक स्तर उंचावावा असे सांगितले.
यावेळी पाठिंबा देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक उपोषण स्थळाला भेट देत आहेत. धनगर व वडार समाज मुळात भटके जीवन जगत असल्याने या समाजाचा एस.टी प्रवर्गात समावेश असावयास हवा होता. परंतु या मागणीचा विचार गेली अनेक वर्षे होत आहे. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत सत्तेत आलेल्या कोणत्याही सरकारने केली नाही. कारण देशातील इतर राज्यात धनगर व वडार समाजाला एस.टी आरक्षण लागू आहे. पण महाराष्ट्र राज्यात सरकारच्या गलथान कारभारामुळे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
यासाठी भाई आकाश निर्मळ यांनी गेली तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत धनगर व वडार समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. अशी भुमिका घेतल्याने सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मुख्य मागणीचा विचार करावा. असेही सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी उपोषण स्थळी सांगितले आहे.
stay connected