समाजकल्याण निधीचा गैरवापर करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा - सुरेश पाटील

समाजकल्याण निधीचा गैरवापर करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा - सुरेश पाटील



बीड (प्रतिनिधी)

     बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरिब जनतेच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक विविध उपाययोजना करत असते त्यासाठी भरघोस असा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या कल्याणासाठी वितरित केला जातो. परंतु समाज कल्याण विभागाच्या निधीचा वापर योग्य त्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी निधी वापरून बोगस कामे केल्याचे आजपर्यंत निदर्शनास आले आहे. त्यामुळे समाज कल्याण विभागाने तक्रारी आल्यास त्याची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अश्या सूचना शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना केल्या. 

     नुकतीच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटील यांनी बीड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी शिंदे साहेब यांची भेट घेऊन जिल्ह्यातील अनेक गावात समाज कल्याण चा निधी वितरित झाला परंतु वितरित झालेल्या निधी योग्य ठिकाणी न वापरता चुकीच्या व बोगसगिरीच्या माध्यमातून सारखे राजकारणाच्या घरात गेला आहे संबंधित गावच्या कोणत्याही व्यक्तीची तक्रार आल्यास त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन चुकीच्या ठिकाणी वितरण झालेला निधी चौकशीअंती सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करून चुकीच्या ठिकाणी वितरित झालेला निधी तात्काळ वसूल करण्यात यावा अशा सूचना सुरेश पाटील यांनी समाज कल्याण विभागाला दिल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.