आ.बाळासाहेब आजबे यांनी अधिवेशनात मांडल्या मतदारसंघातील प्रलंबित मागण्या
आष्टी प्रतिनिधी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पीय मागण्या संदर्भात आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील शेती शैक्षणिक व पाणी या महत्त्वाच्या मुद्द्यावर आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी सभागृहात मागण्या मांडून मतदारसंघासाठी विधानसभेत आवाज उठवला.
आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्या या पुरवणी अर्थसंकल्पीय मागण्या चर्चासत्राच्या दरम्यान आमदार बाळासाहेब आजबे यांनी विधानसभेत मांडत असताना आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणारी आष्टी उपसा सिंचन योजनेचे काम सुरू असून पुढील कामासाठी भरघोस निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा व कुकडी योजनेतून मेहकरी व सीना धरणात येणारे पाणी हे फक्त ओव्हरफ्लॉचे पाणी न देता नियमित रोटेशन नुसार पाणी देण्यात यावे म्हणजेआष्टी तालुक्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागेल या प्रमुख मागणी बरोबरच मतदार संघातील शेतकऱ्यांच्या फायद्याची असणाऱ्या मेहकरी मातकुळी ,दादेगाव ,कडा या सह आदि साठवण तलावातील कालवा दुरुस्तीसाठी ही निधीची आवश्यकता आहे हे तलाव 1962 दरम्यान झाले असल्याने या तलावाखालील कालवा हे नादुरुस्त आहेत त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे, त्याचबरोबर आष्टी तालुक्यामध्ये सुरुडी व शेडाळा या ठिकाणी असलेल्या आश्रम शाळेसाठी मुलींच्या वस्तीगृहासाठी निधी मंजूर झाला असून मुलांच्याही वस्तीगृहासाठी निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा त्याचबरोबर सिंदफणा नदीवरील दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे प्रस्ताव दाखल असून हे होणे गरजेचे आहे त्यासाठी ही निधीची उपलब्धता या पुरवणी अर्थसंकल्पात माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी करून द्यावी अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी विधानसभेत बोलताना केली.
stay connected