बाबासाहेब पोकळे हे "बेलगाव भूषण" व सौ सुनीता खाडे ह्या "आदर्श माता " पुरस्काराने बेलगाव येथे सन्मानित
आष्टी ( प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील नागरी सत्कार समिती व गावातील ग्रामस्थांच्या वतीने शाळा महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेलगाव चे नाव उज्वल करणाऱ्या व आपला व्यवसाय सांभाळणाऱ्या व्यक्तीला "बेलगाव भूषण"व आपल्या मुलाबाळावर योग्य संस्कार करून त्यांना घडवणाऱ्या मातेस"आदर्श माता"हे दोन पुरस्कार राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर साहेब व गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
गावातील युवक बाबासाहेब छगन पोकळे व नागेश छगन पोकळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसलाही अनुभव नसताना सुरू केलेला "मातोश्री ग्रॅनाईट ,आष्टी" हा व्यवसाय अल्प कालावधीत भरभराटीस आणला सुरुवातीच्या काळात तलाठ्याकडे काम करणारे बाबासाहेब यांनी शून्यातून विश्व निर्माण केले व्यवसाय करत असताना आपली शेती व बेलगावशी असलेले नाळ जोडून ठेवली . बंधू नागेश यानेही समर्थपणे साथ दिली. म्हणून बाबासाहेब व नागेश या बंधूंना बेलगाव भूषण हा पुरस्कार देण्यात आला.
त्याचप्रमाणे बेलगाव येथील सूर्यभान दगडू पोकळे यांच्या कन्या व शिक्षण संस्था प्रमुख सुखदेव पोकळे यांच्या भगिनी सौ. सुनिता दादासाहेब खाडे यांनी दहा वर्षे लातूर येथे आपल्या मुलाजवळ राहून तिघांनाही वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षित केले आजही तीनही मुले डॉक्टर असून समाजाची सेवा करीत आहेत. त्यांना माहेरच्या वतीने "आदर्श माता पुरस्कार" देण्यात आला
यावेळी गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंद थोरवे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन समन्वयक ॲड. सीताराम पोकळे यांनी केले.
stay connected