लक्ष्मण दिवटे यांच्या उसवण कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

 लक्ष्मण दिवटे यांच्या उसवण कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 



विकास साळवे बीडसागवी आष्टी 

           महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे,  शाखा अहमदनगर यांचा माननीय आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय कथासंग्रह साहित्य पुरस्कार लक्ष्मण दिवटे यांच्या उसवण कथासंग्रहाला मा. पद्मश्री  पोपटराव पवार,  मा. सौ. सुनिताराजे पवार (कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ), मा. आमदार मोनिकाताई राजळे,  मा. आमदार सत्यजित तांबे, मा. आमदार संग्रामभैय्या जगताप,  जयंत येलुलकर,  मेधाताई काळे, साहित्यिक सुरेश पाटील,  महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अहमदनगरचे अध्यक्ष किशोरजी मरकड यांच्या हस्ते कोहिनूर मंगल  कार्यालय अहमदनगर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 

               लक्ष्मण दिवटे हे आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावचे रहिवाशी असून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करडुळेवस्ती येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उसवण हा त्यांचा पहिलाच ग्रामीण कथासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेतून पायगुन प्रकाशन अमरावती यांनी जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित केला तर  मुखपृष्ठ सरदार जाधव यांचे लाभलेले आहे. उसवण कथासंग्रहाला , 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगरचा शंकर पाटील स्मृती कथासंग्रह पुरस्कार, सनराइज कथासंग्रह पुरस्कार , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार लातूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचा उल्लेखनीय साहित्य पुरस्कार, तितिक्षा इंटरनॅशनलचा उत्कृष्ट कथासंग्रह साहित्य पुरस्कार असे  राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. 


             लक्ष्मण दिवटे यांच्या यशाबद्दल युवा नेतृत्व सागर आप्पा धस बीड सांगवी सरपंच नंदकिशोर करांडे युवा नेते संपत ढोबळे  मा.राज्यमंत्री श्री सुरेश धस अण्णा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष तात्या गणगे अर्जुन नरवडे लहु करडुळे सोमनाथ करडुळे विजय डुकरे माजी सरपंच बबनराव करांडे अवधूत गुप्ते पंडित गोकुळ नरवडे गणेश नरोडे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी सोमनाथ करडुळे ग्रामपंचायत सदस्य बीड सांगवी पोपटराव करडुळे मारुती करडुळे ज्ञानदेव करडुळे जालीदर मस्के सर गोरख करांडे सर पप्पु नरवडे बापुसाहेब गणगे मुकादम डिगाबर नरवडे जिजाबा करडुळे बिभीषण करडुळे मल्हारी करडुळे रफिक शेख अजित ढोबळे घनश्याम पुढारी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक बीड सांगवी अध्यक्ष सदस्य करांडे वस्ती शाळा अध्यक्ष व सदस्य करडुळे वस्ती अध्यक्ष व सदस्य जिल्हा परिषद शाळा प्राथमिक बीड सांगवी मुख्याध्यापक व शिक्षक स्टाप करडुळे वरती शिक्षक स्टाप आष्टी तालुक्यातील तसेच केंद्रातील सर्व शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.