माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या उपस्थितीमध्ये... बेलगाव येथे गुणवंतांचा सत्कार
आष्टी (प्रतिनिधी)
बेलगाव हे आष्टी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर गाव आहे .येथील मुला- मुलींनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायात गावचे नाव उज्वल केले आहे .अलीकडच्या काळात येथील युवक नोकरी ऐवजी उद्योग व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. येथील माता भगिनींनी व पालकांनी अपार मेहनत घेऊन आपल्या मुलाबाळांना उच्चशिक्षित केले आहे .तसेच अनेक विद्यार्थी दहावी बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून गुणवंत ठरले आहेत.
अशा गुणवंतांचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी सकाळी साडेआठ वाजता बेलगाव येथे आयोजित केला आहे. अशी माहिती नागरी सत्कार समितीचे समन्वयक ज्येष्ठ पत्रकार ॲड. सिताराम पोकळे यांनी दिली. पुढे त्यांनी सांगितले की, या सत्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर साहेब, बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे साहेब, माझी शिक्षणाधिकारी अरुण धामणे साहेब, आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव साहेब आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी गावातील सातवी दहावी व बारावी या वर्गामध्ये गावामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शासकीय व खाजगी नोकरी मध्ये नव्याने रुजू झालेले गावातील युवक यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय यावेळी या नागरिक सत्कार समितीतर्फे एक व्यक्ती"बेलगाव भूषण"व एक व्यक्ती "आदर्श माता"हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.
बेलगाव व परिसरातील नागरिकांनी या सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात येत आहे.
stay connected