मजुरांना कामगार साहित्य मोफत न देता नगरसेवक मजूरा कडून करतात पैशाची मागणी - तालुका अध्यक्ष सय्यद मुबीन यांचा आरोप
(आष्टी प्रतिनिधी ). आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांची परिस्थिती सुधारावी, यासाठी सरकार विविध योजना राबवते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील तालुका आष्टी येथील नगरपंचायत चे एक नगरसेवक मजुरांना मोफत सुरक्षा किट च्या नावा खाली हजारो रूपयांला गडंवण्याचे प्रकार समोर येत असल्याचे महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटनेचे आष्टी तालुका अध्यक्ष सय्यद मुबीन यांनी म्हटले आहे .
पुढे बोलताना कामगार सघंटनेचे तालुका अध्यक्ष सय्यद मुबीन यांनी म्हटलेकी महाराष्ट्र शासनाचे उपक्रम महाराष्ट्र बाधंकाम कामगार मडंळाच्या वतीने अनेक योजना आहे ती योजना अगदी मोफत असुन आष्टी तालुक्यात नगरपचांयतचेच नगरसेवक दलाली म्हणुन कष्टकरी कामगारां कढुन गृह उपयोगी साहित्य मंजुर करून देतो म्हणुन हजारो रूपये जमा करत आहे खरं पाहिले तर हे सर्व साहित्य कामगांर मंडळाकडून मोफत दिले जाते कोणत्याही कामगांरानी त्या दलालांना दमडी पन द्यावे नाही ह्या नगरसेवक दलालांन कामगाराकडून पैसे घेने बदं करावे नसता त्याची पोल खोलुन कायदेशीर कारवाही करून त्याला महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटना जनते समोर आणल्या शिवाय गप्प बसनार नाही असा इशारा आष्टी तालुका अध्यक्ष सय्यद मुबीन यांनी दिला आहे .
stay connected