याशिनबी व युनुस चेअरमन यांचे दुःखद निधन
मायलेकराचे एकाच दिवशी निधनाने गावावर शोककळा
आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील सराटेवडगाव येथील याशिनबी शेख (वय १०२) यांचे सकाळी ८ वाजता वृद्धपकाळाने तर युनुस शेख (चेअरमन) यांचे सायंकाळी ५.३० वाजता या मायलेकराचे सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन. आईवर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तर मुलावर रात्री १० वाजता सराटे वडगाव येथील कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मायलेकरे एकाच दिवशी गेल्याने शेख परिवारासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सांगवी पाटण येथील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांचे ते मामा होते तर सकाळी निधन झाले त्या आज्जी होत्या. युनूस चेअरमन हे आमदार सुरेश धस यांचे खंदे समर्थक होते.
stay connected