नगरमधील व्यावसायिक दुकानदारास २ लाख रुपयास लुटले असा आरोप असलेल्या मुख्य आरोपी यांना जामीन मंजुर.

 


नगरमधील व्यावसायिक दुकानदारास २ लाख रुपयास लुटले असा आरोप असलेल्या मुख्य आरोपी यांना जामीन मंजुर.



अहमदनगर - तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर येथे भारतीय दंड संहितेचे कलम ३९५, ४२७, ५०६, ३४ या कलमान्वये दाखल गुन्हयातील आरोपीस अहमदनगर येथील मे. न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीगत -दि.११/०६/२०२४ रोजी रात्री ९:३० वा. चे सुमारास फिर्यादी अविनाश लक्ष्मण मांडगे हे त्यांचे हर्षल मोबाईल शॉपी बंद करुन दुकानात जमा असलेली रक्कम रु.२,००,०००/- व त्यांचे दोन मोबाईल एका पिशवीत ठेवून त्यांची मोपेड क्र.एम एच १६ सी. एच ५४६१ चे डीकीत ठेवून घराकडे जात असताना मनमाड रोडने मारुतीराव घुले पाटील कॉलेज समोर आले असता पाठीमागून एका चारचाकी वाहनाने त्यांचे मोपेडला जोराची धडक दिली व सदर चारचाकी वाहनातील चार अनोळखी इसम यांनी उतरुन अविनाश लक्ष्मण मांडगे यांना मारहाण करण्याची धमकी दिली. त्यावेळी एका इसमाने फिर्यादी यांचे डिकीतील रु.२,००,०००/- व दोन मोबाईल असलेली पिशवी घेवून पळून गेले. त्यानंतर फिर्यादी अविनाश लक्ष्मण मांडगे यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयातील आरोपी नं.१ यांना अहमदनगर येथील मे. न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली व त्यानंतर दि.१५/०६/२०२४ रोजी मे. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडीचा आदेश केला. त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपी यांनी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात दि.१९/०६/२०२४ रोजी जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाची नुकतीच सुनावणी झाली. आरोपीच्या वकीलांनी युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. न्यायालयाने आरोपीस दि. २८/०६/२०२४ रोजी अटी व शर्तीवर जामीन मंजुर केला.

आरोपीच्या वतीने अॅड. देवा थोरवे व अॅड. सागर कुर्हाडे यांनी युक्तीवाद केला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.