पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राज्यात दैदिप्यमान कामगिरी करेल. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे प्रतिपादन

 पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राज्यात दैदिप्यमान कामगिरी करेल. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे प्रतिपादन 




******************************

आष्टीत सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने फटाके पेढे वाटून जलोषात स्वागत

******************************

आष्टी (प्रतिनिधी)

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सक्षम वारसदार, महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास,महिला व बालकल्याण विभागाच्या माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत अल्पशा मताने निसटता पराभव झाला असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे यासाठी लवकरात लवकर पंकजाताई मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करून महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये नवचैतन्य निर्माण करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी पक्ष नेतृत्वाकडे प्रत्यक्ष जाऊन आणि प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे मागणी केलेली मान्य झाली याबद्दल भारतीय जनता पार्टी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त करतो असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले.

     धस पुढे बोलताना म्हणाले,विधानपरिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने जाहीर केलेल्या विधानपरिषद उमेदवारांच्या नामावली मध्ये पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचे क्रमांक १ वर नाव घोषित केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे यांना अल्पशा मताने दुर्दैवी पराभव पत्करावा लागला होता. तरी त्यांनी नवीन उत्साह पूर्वक पक्ष कार्याला त्यांनी वाहून घेतले असतानाच त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठीने घेऊन त्यांना विधानपरिषदेची बुधवारी उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर धडाडीच्या आणि लोकप्रिय नेत्या असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक जोमाने काम करील आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या या कामाचे प्रतिबिंब उमटणार आहे असेही माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Vdo पहा👇



*आष्टीत सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने जल्लोष...*


लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या विधानपरिषद सदस्याची  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 

आष्टी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आणि  नगरपंचायत कार्यालयासमोर आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने कार्य असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून 251 फटाक्याची सलामी देऊन जयघोषात जल्लोष स्वागत आणि अभिनंदन केले.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.