खाजगी सावकारांनी गोरगरिबांचे पैसे परत द्यावेत, अन्यथा थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार :- माजी आमदार भीमराव धोंडे
आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील खाजगी सावकारांकडून अनेक गोरगरीब, शेतमजूर तसेच शेतकऱ्यांची प्रॉपर्टी लिहून घेण्यात येत आहे तसेच आर्थिक शोषण करण्यात येते अशा पिडीत लोकांनी माझ्याकडे त्या सावकाराचे नाव व स्वतःचे नाव द्यावे, अशा सावकारांनी गोरगरिबांचे पैसे परत द्यावेत अन्यथा मी थेट राज्याचे गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी येथे सांगितले.
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बुधवार दिनांक १० जुलै पासून जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी आष्टी शहरात फिरून लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सावता माळी मंदिर व रेणुकामाता मंदिरात झालेले छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने माजी आमदार भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन स्वागत करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आ. भिमराव धोंडे यांनी मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आष्टी शहरापासून जनसंपर्क अभियान सुरू केले त्यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा संघाचे श्रीधर पंत तसेच शरद निराळे, शाकेर कुरेशी, रमेश निकाळजे, हौसराव वाल्हेकर , ॲड. मुकरम सय्यद ,बाबा धोंडे खासबाग, डी.जी. देशपांडे सर, ऍड. श्रीकृष्ण देशपांडे,बबनराव कदम, डॉ. श्रीकांतनाना कुलकर्णी , रिजवान शेख, डी . के. सनगर, इम्रान खान, यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या तसेच शिंदे वस्ती,भिमनगर, फुले नगर, सावतामाळी मंदिर भाजी मंडई या भागात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रेणूका माता मंदीरात देवीचे दर्शन घेतले. शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, नगरपंचायत निवडणुकीत आपण सहकार्य केल्यामुळेच सत्ता आली परंतु त्यांच्याकडून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत, नालीची दुरुस्ती केली जात नाही, रस्त्यावर पाणी येत आहे अशा अनेक समस्या नागरिकांनी सांगितल्या, तसेच भिमनगर येथील जि. प. शाळेची अवस्था अतिशय वाईट आहे. सर्वसामान्यांनी कोणालाही घाबरायचे नाही. मोगलाई किंवा निजामशाही नाही आता लोकशाही आहे. याप्रसंगी सुर्यकांत धोंडे, अस्लम बेग, चेअरमन अरुण सायकड, डी. के. सनगर, श्रीकांत सनगर, दत्ता सायकड यांची भाषणे झाली. अभियानामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव म्हस्के,माजी शिक्षण सभापती नियामत बेग,माजी सरपंच बन्सिभाऊ पोकळे,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, अज्जुभाई, चेअरमन अरुण सायकड,बाजीराव वाल्हेकर, मोहसिन कुरेशी, आस्ताक शेख, रहान बेग, बाळासाहेब भुकन, शाकीर कुरेशी, रत्नदिप निकाळजे,अन्सार कुरेशी,रुपेश निकाळजे ( क्रांतीचा साक्षीदार ), अरबाज कुरेशी, मोहम्मद सेठ कुरेशी, संजय निकाळजे, सरपंच माऊली वाघ, शिराज बिल्डर कुरेशी, ऍड. मुकरम सय्यद, वसंत निकाळजे,साहेबराव निकाळजे, माजी नगरसेवक बाबा धोंडे,रमेश निकाळजे, विनोद निकाळजे, विजय निकाळजे, हौसराव फक्कड, उल्हास निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते अशोक निकाळजे,जालींदर निकाळजे, कल्याण निकाळजे, दिलीप शिंदे, दत्तात्रय धोंडे, रामदास मुळे, आण्णा धोंडे, इम्रान तांबोळी, महेश टेकाडे, आबासाहेब शिंदे व इतर उपस्थित होते. शेवटी व्यापाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महात्मा गांधी विद्यालयात अभियानाचा समारोप झाला. आष्टी करांनी अभियानला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
stay connected