आष्टीत दीर्घ विश्रांतीनंतर पावसाची हजेरी खरीप पिकांना दिलासा; बळीराजा सुखावला

 आष्टीत दीर्घ विश्रांतीनंतर पावसाची हजेरी
खरीप पिकांना दिलासा; बळीराजा सुखावला



-------------

राजेंद्र जैन / कडा 

-------------- 

दीर्घ विश्रांतीनंतर आष्टी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना मोठा आधार मिळाला असून, बळीराजा सुखावला आहे .

आष्टी तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने खंड पडला. जुलै महिन्यात मंगळवारी पावसाने हजेरी लावली होती . त्यानंतर पुन्हा एकदा पावसात खंड पडला. मात्र सोमवारी संध्याकाळी सहानंतर पावसाने सुरुवात केली. आष्टी तालुक्यात बऱ्याच भागात दमदार पाऊस झाल्याने खरीप पिकांना याचा मोठा फायदा होईल. चाऱ्याचा प्रश्न ही बऱ्यापैकी मार्गी लागेल. त्यामुळे आता बळीराजाची चिंता दूर झाली आहे.

------




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.