माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या कडून भगवानबाबांच्या पालखीचे दर्शन
आष्टी प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या भगवान गडाच्या भगवानबाबांच्या पायी दिंडी सोहळ्याला भेट देऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पालखीतील पादुकांचे पुजा करीत दर्शन घेऊन त्यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. आषाढी एकादशी निमित्त मराठवाड्यातील सर्वाधिक दिंड्या व लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंडीमध्ये जातात. सर्व जाती धर्मातील वारकरी मनोभावे दिंडीत सहभागी होतात. गहिनीनाथ गड व भगवान गडाच्या दोन्ही दिंड्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. भगवान गडाच्या भगवानबाबांची पालखी पाटोदा शहरात आली असता भामेश्वर मंदीरात माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली याप्रसंगी संकेतचे संपादक नरेंद्र कांकरीया, आप्पा राख, नगरसेवक कवठेकर, काकासाहेब लांबरुड, माजी सभापती अनिल जायभाय, पोलीस पाटील सुहास जाधव, पत्रकार छगन मुळे, माजी नगरसेवक जोशी, माजी पोलीस निरीक्षक संपतराव पाळुदे,अंगद सानप, संजय कांकरिया, महारुद्र गर्जे,पोलीस निरीक्षक केदार व इतर वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected