पाटोदा नगरपंचायत येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पाठक साहेब त्यांचे हस्ते संपन्न.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नगरपंचायत च्या वतीने प्रभावीपणे राबवावी- पाठक साहेब
आ.सुरेश (आण्णा) धस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाच्या घरी जाऊन एकही महिला वंचित राहणार नाही याची आम्ही दक्षता -नगराध्यक्ष जाधव
आष्टी प्रतिनिधी - पाटोदा नगरपंचायत च्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री अविनाशजी पाठक साहेब , जिल्हा परिषद चे मुख्य अधिकारी श्रीमती संगीता देवी पाटील, एच,डी,एम श्री कुदळे साहेब व श्री मुख्याधिकारी श्री अभयजी जोशी साहेब , सिडपीओ श्री केकान साहेब,नगराध्यक्षा सौ दिपाली राजूभैय्या जाधव, उपनगराध्यक्ष श्री शरद बामदळे, श्री आदम शेठ, यांच्या हस्ते कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी श्री अविनाशजी पाठक साहेब यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पाटोदा नगरपंचायत च्या वतीने प्रभावीपणे राबवावी व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यांच्या साह्याने आपण यशस्वी होऊ अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ दिपाली राजूभैय्या जाधव यांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ग्राउंड ला जाऊन पाटोदा नगरपंचायतच्या माध्यमातून व लोकनेते सुरेश (आण्णा) धस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राउंड ला जाऊन कुठलीही बहीण वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ व बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायत एक नंबर असेल असा विश्वास नगराध्यक्ष सौ दिपाली राजूभैय्या जाधव यांनी व्यक्त केला व्यक्त केला.
याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री सोमीनाथजी कोल्हे साहेब, पत्रकार विजय जाधव, श्री महेशजी बेंदरे ,
श्री सभापती हनुमंत काळे, श्री सभापती रामेश्वर गोरे, सभापती श्री रोहिदास गिते, सभापती किशोर आडागळे,श्री नगरसेवक संतोष जाधव, नगरसेवक नय्युम भाई ,श्री नगरसेवक अँड श्री सुशीलजी कवठेकर, नगरसेवक सतीश घोलप, नगरसेवक श्री सुनीलजी वाघमारे याप्रसंगी पाटोदा नगरपंचायत चे पदाधिकारी व स्वच्छता विभागाचे कर्मचारी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..
सूत्रसंचालन श्री संदीप दादा जाधव यांनी केलं आभार श्री प्रेमचंद्र मस्के साहेब यांनी केले.
stay connected