जि.प.शिक्षक शेंडगे यांचे निलंबन
बीड : आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शेंडगे यांना गैरवर्तनाच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी शुक्रवारी निलंबनाचे आदेश जारी केले. शेंडगे यांच्याबाबत विद्यार्थी व पालकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तो शाळेत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भातील सविस्तर अहवाल आष्टीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठविला होता. या अहवालाची दखल घेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील यांनी शेंडगे यांना तत्काळ निलंबित केले.
Advertis
stay connected