दादेगाव येथे मच्छिंद्रनाथ (मायंबा) दिंडी रथाची महापूजा संपन्न

 दादेगाव येथे मच्छिंद्रनाथ (मायंबा) दिंडी रथाची महापूजा संपन्न



कडा प्रतिनिधी - मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथून पंढरपूरकडे चाललेल्या पायी दिंडी रथाचे दादेगाव येथे आगमन होताच ग्रामस्थातर्फे भव्य स्वागत करण्यात आले.

वै. ह.भ.प.रघुनाथ महाराज उंबरेकर, वै. ह.भ.प.सावजी बाबा व ह.भ.प.हंडाळ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सावरगाव, शेंडगेवाडी यांच्या अधिपत्याखाली व जनता जनार्धनाच्या सहकार्याने चाललेल्या या दिंडी सोहळ्याचे हे ३८ वर्षे आहे.

यावर्षी दादेगाव येथे या दिंडी रथाची महापूजा  श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव बाबासाहेब म्हस्के व कोषाध्यक्ष रमेश ताठे यांच्या हस्ते करण्यात आली. व अण्णासाहेब इथापे प्रतिष्ठान तर्फे वारकऱ्यांना टोपी - पंचा व महिलांना स्कार्फ वाटप करण्यात आले. व प्रसाद - नाष्टा देण्यात आला.

यावेळी हभप भानुदास महाराज, सुखदेव महाराज, ट्रस्टचे नवनाथ चेअरमान, अर्जुन म्हस्के, राजाभाऊ म्हस्के, गणेश बोरुडे, विठ्ठल भगत तसेच रामकृष्ण इथापे, रामचंद्र खेंगरे,बाबासाहेब बांदल, लक्ष्मण पठारे, श्रीराम इथापे, बाबुराव पठारे, संभाजी खेंगरे,बालू विधाते, विक्रम बांदल, मुरलीधर पठारे मधू पठारे सचिन बांदल श्रीकांत इथापे, सोनू पठारे, नाथाजी वाघुले,गोरख तांबे, प्रा.अजित इथापे, विजुभाऊ पोटे, तान्हाजी पोटे आदी उपस्थित होते. हा दिंडी सोहळा दादेगाव येथून देविनिमगाव, केरुल मांडवा, बलेवाडी, खडकत, नवसरवडी, जातेगाव, करमाळा, गुळसडी, सराफडोह, वडशिवणे, दहीवली, कण्हेरगाव,माढा कारखाना, तांबवे, करकंब, भोसे, कोकनदी, विठ्ठल कारखाना व पंढरपूर येथे दि.१५ जुलै २०२४ ला पोहचेल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.