कुमारी दिपल दिनेश पाटील ही पुणे जिल्हा शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी च्या गुणवत्ता यादीत झळकली.
सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे,३५ येथील कुमारी दिपल दिनेश पाटील ही पुणे जिल्हा शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी च्या गुणवत्ता यादीत झळकली.
नवनगर शिक्षण मंडळाचे, सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे,३५ या विद्यालयाची कुमारी दिपल दिनेश पाटील ही पुणे जिल्हा शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी च्या गुणवत्ता यादीत झळकली त्याबद्दल तिचे संस्थेच्या,शाळेच्या,सर्व शिक्षकांच्या,पालकांच्या,वर्ग मित्रमैत्रिणीच्या,अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या वतीने हार्दिक- अभिनंदन करण्यात आले !! संस्थापक श्री.गोविंद दाभाडे सर यांनी तिला पुढील भविष्य वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा दिल्या!!! तिला मराठी विषयाचे अध्यापन सौ.उभे मॅडम,गणित विषयाचे अध्यापन सौ.बनसोडे मॅडम व सौ.पाटील मॅडम,इंग्रजी विषयाचे अध्यापन सौ.प्रतिमा काळे मॅडम,तर बुद्धिमत्ता विषयाचे अध्यापन श्री.पवार सर व श्री.वांगेकर सर यांनी केले.या सर्व शिक्षकांचे तसेच तिच्या पालकांचे विशेष सहकार्य लाभले.
stay connected