मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा...
सेतू सुविधा केंद्र आणि महसूल यंत्रणेकडून सहकार्य अपेक्षित..
-आ.सुरेश धस
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभार्थी महिला भगिनींनी लाभ घ्यावा.शिवाय या योजनेसाठी गावोगावी सुरेश धस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महिला भगिनींना अडचण येऊ नये यासाठी मदत केंद्र उभारले आहेत.मात्र सेतूसुविधा केंद्रचालक व महसूल प्रशासन यंत्रणेकडून या महत्वपूर्ण कामासाठी सहकार्य व्हावे अशी अपेक्षा माजीमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे.
या योजनेबाबत सांगताना धस यांनी आवाहन केले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकार कडून करण्यात आली. अत्यंत चांगली योजना राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेचा सर्व महिला भगिनींनी लाभ घ्यावा त्याचबरोबर दि.३१ ऑगस्ट पर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करण्यात यावी.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५००/रू. रुपये मिळणार आहेत.महिलांना ही योजना कमीत कमी खर्चात कशी मिळेल यासाठी आष्टी,पाटोदा शिरूर तालुक्यातील तहसीलदार यांनी यावर कटाक्षाने नजर ठेवत अल्प खर्चामध्ये या योजनेचे कागदपत्र महिलांना उपलब्ध होतील यासाठी मदत करावी तसेच या योजनेबाबत ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने मदत केंद्रांची उभारणी केलेली असून जास्तीत जास्त महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केले आहे.
-----------
मदत केंद्र सुरू
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी आष्टी ,पाटोदा,शिरूर तालुक्यातील सर्व मतदार संघातील गावोगावी सुरेश धस मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केंद्र सुरू केले या योजनेबाबत आर्थिक नुकसान व लूट होऊ नये यासाठी हे मदत केंद्र असणार असून प्रशासनाच्या कागदपत्रासाठी येणाऱ्या अडचणी बाबत या मदत केंद्रात मार्गदर्शन करण्याचे काम कार्यकर्ते करतील असेही सुरेश धस यांनी सांगितले.
--------
अटी शिथिल
पूर्वीच्या आदेशामध्ये या योजनेचा लाभ एकत्रित कुटुंबातील पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी असे होते परंतु ही एक अट आता शिथिल करण्यात आले असून वयाची मर्यादा देखील २१ वर्ष ते ६५ वर्षापर्यंत करण्यात आलेली असून राज्यातील अधिवासाबाबत देखील अट शिथिल करण्यात आलेली आहे.
stay connected