संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे मानधन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात होणार जमा
आष्टी प्रतिनिधी - वयाची 65 पूर्ण झालेल्या निराधार महिला व पुरुषांना तसेच विधवा, दिव्यांग, घटस्फोटीत, परितक्ता आदिंना
राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेतून मानधन देण्यात येते. आतापर्यंत हे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यावर बँकेद्वारे पाठवण्यात येत असे परंतु यापुढे लाभार्थींना DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट मासिक लाभ हस्तांतरित करण्याचे शासनाचे धोरण आहे. या ऑनलाईन प्रक्रियसाठी सर्व लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आपल्या आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे.
तसेच, सर्व लाभार्थ्यांनी आधार कार्ड, बॅंक पासबुक, आपण लाभ घेत असलेल्या प्रदनिहाय योजनेचा प्रकार, जात, प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास), विधवा महिला (पतीचे मृत्यू प्रमाणपत्र), अनाथ बालक (असल्यास प्रमाणपत्र) इ. कागदपत्रे संजय गांधी योजना कार्यालयात त्वरित जमा करावेत. अन्यथा आपणास यापुढे (एप्रिल २०२४ पासून), राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार नाही.
-----------
stay connected