Horror Marathi Movie Alyad Palyad : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई : गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा

 Horror Marathi Movie Alyad Palyad  : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई : गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा



अल्याड पल्याड' बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

 बॉक्स ऑफिसवर हॉरर कॉमेडीपटांची चलती आहे. बॉक्स ऑफिसवर Alyad Palyad Marathi Movie या मराठी हॉरर कॉमेडीपटाने चांगलीच कमाई केली आहे.  'अल्याड पल्याड' बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'अल्याड-पल्याड 2' (Alyad Palyad 2) हा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आष्टीचे सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रपट कथा सवाद लेखक संजय नवगिरे लिखीत अल्याड पल्याड या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरणाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.  प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादानंतर आता  निर्माते  शैलेश जैन, महेश निंबाळकर आणि  दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड 2’ ची घोषणा केली आहे. चित्रपटाचे पोस्टर  सोशल माध्यमावर पोस्ट करत 'अल्याड पल्याड’ चा सिक्वेल अर्थात 'अल्याड पल्याड २’ ची घोषणा  करण्यात आली आहे.

अल्याड पल्याड’ चित्रपटात भयासोबत विनोदाची सुद्धा किनार होती. भयाबरोबरच विनोदाचीसुद्धा योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. 'आमचा पहिला चित्रपट लोकांना  इतका आवडलाय आणि त्याच्या दुसऱ्या भागाची  उत्सुकता आहे याचं आम्हाला खरंच खूप छान वाटतेय, अशा भावना कलाकारांनी  व्यक्त केल्या. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक,सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा,चिन्मय उदगीरकर, भाग्यमजैन,अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.

दर्जेदार कलाकृतीचा निर्माता म्हणून मिळणारे समाधान आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून नवनवीन विषय घेऊन येण्याची मराठीची क्षमता बघूनच मराठीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी सांगितले. ‘अल्याड पल्याड’ चा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.