सुलेमान देवळा ग्रामपंचायतने सुरु केलेल्या Mukhyamantri ladki Bahin योजनेच्या मोफत ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 सुलेमान देवळा ग्रामपंचायतने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या मोफत ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.



सुलेमान देवळा-शाहनवाज पठाण

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्याने सर्वत्र महिलांची फॉर्म भरण्यासाठी गर्दी झाल्याने, अनेक ठिकाणी महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.महिलांना कागदपत्रांसह इतर कसलीही अडचण येऊ नये यासाठी सुलेमान देवळा येथे सर्व महिलांचे लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज मोफत भरण्याची सुविधा सुलेमान देवळा ग्रामपंचायतने उपलब्ध केली.


महाराष्ट्र शासन राज्यातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबवत असून, शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून, यामध्ये शेतकरी /महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून, महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली असून, यामध्ये ज्या महिला पात्र ठरतील अशांना पंधराशे रुपये महिना देण्यात येणार असून, या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी झाल्या मुळे ग्रामपंचायत  यांच्या वतीने कॅम्प घेऊन महिलांना मोफत अर्ज भरण्याची सेवा पुरवली असून, गावातील महिला सर्व कागदपत्र जमा करून महिलांनी योजनेचा लाभ घेतला घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून गावचे सरपंच दादासाहेब घोडके, उपसरपंच भाऊसाहेब घोडके, कृषी अधिकारी खोमणे ए एन,तलाठी बी एल सावंतफुले, केंद्र चालक सचिन खोरदे, ईश्वर ओव्हाळ, अंगणवाडी सेविका सुमन घोडके, सविता गायकवाड, शिला काळे, नंदा ओव्हाळ हे परिश्रम घेत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.