PANDHARPAUR | माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते तर ते वारकरी होते, माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही- संदिपान भुमरे
शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हीआयपी दर्शना रून मोठा वाद सुरू झाला आहे. दरम्यान याप्रकरणी खासदार भुमरे यांनी घुमजाव करत माझ्यासोबतचे कार्यकर्ते नसून ते वारकरी होते असा दावा केला आहे. आज खासदार संदिपान भुमरे व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन दिले आहे. व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते तर ते वारकरी होते. वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही. मी स्वतः दर्शन रांगेतूनच दर्शन घेतले आहे. त्यामुळे माझ्या दर्शनामुळे कुठेही वारकऱ्यांना त्रास झालेला नाही, असा दावा ही यावेळी खासदार भुमरे यांनी केला आहे.
stay connected