SANGLI | रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने सांगली स्टॅन्ड येथे झेलभरो आंदोलन
सांगली - केंद्र शासनाने 29 डिसेंबर 2016 रोजी अधिसूचनेनुसार परिवहन सर्व वर्गातील लावण्यात आलेल्या प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क रद्द करावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनेच्या वतीने शासन व प्रशासन यांना निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु शासन दरबारी मागणीचा कोणताच विचार केला जात नसल्याने आज संघटनेच्या वतीने सांगली बस स्थानकाजवळ झेलभरो आंदोलन केले आहे. कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने त्वरित निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार आज संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळेस कृती समितीचे अध्यक्ष शौकत शेख, रामभाऊ पाटील, महेश चौगुले, फिरोज मुल्ला, अजित नाईक, रामचंद्र सोनवणे, महादेव पवार यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected