Suresh Dhas यांचा विकास कामांचा " मास्टर स्ट्रोक " Ashti मतदारसंघात २५ कोटी रु.किमतीच्या रस्ते कामांना मंजुरी...

 आ.सुरेश धस यांचा विकास कामांचा " मास्टर स्ट्रोक " 
***********************
 आष्टी मतदारसंघात २५ कोटी रु.किमतीच्या रस्ते कामांना मंजुरी... 



***********************



***********************

आष्टी (प्रतिनिधी)

 महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत असताना विधानसभा मतदारसंघातील रस्ते कामांना मंजुरीचा मास्टर स्ट्रोक मारला असून या कामांना मंजुरी दिल्याबद्दल सुरेश धस यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

 आमदार सुरेश धस यांची धाराशिव तथा लातूर बीड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ धाराशिव या मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य म्हणून मुदत संपली असली तरी त्यांनी शेवटच्या टप्प्यात देखील आष्टी विधानसभा मतदारसंघातील रस्तेकामांसाठी शासनाकडून निधी खेचून आणला आहे पुरवणी अर्थसंकल्पामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते कामांसाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती सा.बा.विभाग स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी माहिती दिली आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्ते कामांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे पुढील प्रमाणे आहेत

१) जिल्हा सरहद्द पाथर्डी, रस्त्यावर माळेवाडी ते पाटसरा रस्ता करणे. ७ कोटी

२) रामा-७०ते मोराळा वनवेवडी रस्ता करणे. ५ कोटी

३) सावरगाव मच्छिंद्रनाथ गड रस्ता ते शेंडगेवाडी जोडरस्ता करणे.- ४ कोटी

४)आष्टी शहरात कन्या शाळा ते माऊली मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता करणे - ५ कोटी

५)आष्टी शहर ते जुना पिंप्री रस्ता करणे. (आष्टी-शिराळा रस्त्यापर्यंत)  - ४ कोटी गेल्या अनेक दिवसापासून च्या मागणीनुसार या रस्ता कामांना मंजुरी दिल्याबद्दल पूर्व आमदार सुरेश धस यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजितदादा पवार , सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानले आहेत.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.