आष्टी मतदार संघाचा आमदार कोण होणार ? उद्या 32 फेऱ्यानंतर होणार स्पष्ट

आष्टी मतदार संघाचा आमदार कोण होणार ? उद्या 32 फेऱ्यानंतर होणार स्पष्ट 



आष्टी  विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि. २३) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. १४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण ३२ फे-यांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी जवळपास ३०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शेख मॅडम यांनी दिली.


विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. आष्टी मतदारसंघात प्रथमच चौरंगी लढत होत असून राजकीय स्तरावर विविध लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत. तर प्रशासनाकडून निवडणुकीच्या मतमोजणी व निकालाची तयारी जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने तहसील कार्यालय व मतमोजणी होत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये जय्यत तयारी सुरू आहे.


आष्टी मतदारसंघात ४४० मतदान केंद्रे असून यासाठी एकूण एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. एका फेरीत १४ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. एकूण ३२ फे-यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी ३०० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत आष्टी मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.