सुरेशराव..उपकाराची फेड अपकाराने करु नका ; स्वताःला सिनीअर आमदार म्हणता मग पातळी सोडुन बोलु नका- माजी आ. Bhimrao Dhonde

 सुरेशराव..उपकाराची फेड अपकाराने करु नका ; स्वताःला सिनीअर आमदार म्हणता मग पातळी सोडुन बोलु नका- माजी आ. भीमराव धोंडे

*************************

  



*************************


आष्टी (प्रतिनिधी) ----------आपण विधानसभा निवडणूक जिंकलात आमच्या तुम्हांला शुभेच्छा आहेत. लोक म्हणतात मोठी आर्थिक उलाढाल  झाली, इव्हिएम  घोटाळा झाला असेही लोक म्हणतात मात्र मला असले आरोप करायचे नाहीत.मला जनतेचा कौल मान्य आहे.तुम्ही निवडुन आलात विधायक व विकासाचे कामे करा.. विजयाने हुरळून जाऊन इतरांच्या मनाला लागेल,भावना दुखावतील असे आणि पातळी सोडून टीका टिप्पणी करू नका.

सुरेशराव..उपकाराची फेड अपकाराने करु नका; स्वताःला सिनीअर आमदार म्हणता मग पातळी सोडुन बोलु नका असा सल्ला पराभुत अपक्ष उमेदवार माजी आ. भीमराव धोंडे यांनी दिला.

    आष्टीतील कालच्या सभेत मी सीनियर आमदार आहे हे आपणच सांगितले मग सीनियाॕरिटीला शोभणारी ही भाषा आहे का ?  संस्थेच्या  प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल आपण केलेले  वक्तव्ये योग्य नाही. आम्ही पण असे बोलु शकतो.. आ. पंकजाताई मुंडे शिरुर व कड्याला प्रचारसभेस येऊ नयेत असे मला व बाळासाहेब आजबे यांना वाटत होते कारण आम्ही दोघांनी लोकसभा निवडणुकीत आ. पंकजाताई यांचे भरपुर काम केले होते.परंतु आ. पंकजाताई आष्टी मतदार संघात आल्या आणि माझा पराभव झाला. 



    आष्टीत पत्रकारांशी बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की,आपण काल सभेत म्हणालात की,मी सर्व जाती धर्माच्या लोकांना पदाधिकारी बनवले. मीसुद्धा आमदार असताना लक्ष्मण मरकड,ॲड.साहेबराव मस्के,विष्णुपंत चव्हाण, हनुमंत थोरवे, विजयकुमार बांदल, निजाम पटेल,आदिनाथ सानप, राजेश मुटकुळे, भीमराव साके,लक्ष्मण ननवरे,शिवाजी सुरवसे, बाबासाहेब आंधळे, केशव गर्जे,लालासाहेब शिंदे,अर्जुन बोराडे, गौतम सावंत, बाबा पानसरे, सय्यद खाजाभाई सय्यद, अरुणभैय्या निकाळजे, अशोक साळवे, आण्णासाहेब नाथ, दीपक कर्डीले, रंगाण्णा जगताप,पांडुरंग गावडे, सादिक कुरेशी, आबासाहेब जगताप, मधुकर तांबे,वर्षा सुरेश माळी, सुवर्णाताई लांबरुड, देविदास शेंडगे,अनिल जायभाये व इतर अनेकांना पदाधिकारी करून सामाजिक समतोल, सर्व समावेक्षपणा आम्ही जपलेला आहे. राजकारणातील प्रत्येक राजकीय नेता सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे आपण स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, १९९५ मध्ये बीड जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपद माझ्यामुळेच तुम्हांला मिळाले होते.  शिवाय २००९ मधील विधानसभा निवडणुकीत माझ्या मदतीनेच आमदार झालात.आमदार झालात म्हणून तर राज्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले आहे. त्यामुळे " उपकाराची "  परतफेड  " अपकराने " करू नका.आपण राष्ट्रवादीत असताना भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी आ. पंकजाताई मुंडे यांची मदत घेतली. मीसुद्धा प्रवेश देण्यास विरोध केला नाही. त्यामुळे या प्रवेशाने आपण विधान परिषद सदस्य झालात. हे ही विसरू नये.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.